(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: औरंगाबादमध्ये गोवरच्या आणखी 14 संशयित रुग्णांची भर, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले
Measles Disease Update: आतापर्यंत औरंगाबाद शहरात 214 गोवर संशयित बालके निघाल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
Aurangabad Measles Disease Update: मुंबईपाठोपाठ आता औरंगाबादमध्ये देखील गोवरने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कारण शुक्रवारी एकाच दिवसांत आणखी 14 नवीन गोवर संशयीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आतापर्यंत औरंगाबाद शहरात 214 गोवर संशयित बालके निघाल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. शहरातील वाढत्या गोवर साथीने आरोग्य विभागाची चिंता वाढवली असून, महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे.
मुंबईनंतर आता औरंगाबाद शहरात गोवर साथीचा उद्रेक झाला आहे. गोवरची बालके मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. तर शहरात आतापर्यंत गोववरची 22 बालके पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. तर शुक्रवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला तरीही, आणखी 14 संशयित बालके निघाल्यामुळे आरोग्य विभागासह शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
शहरातील चिकलठाणा, नेहरूनगर, नारेगाव, मसनतपूर, पुंडलिकनगर, हर्षनगर, हसूल या भागांत गोवरचा उद्रेक पाहायला मिळत आहे मनपाच्या आरोग्य विभागाकडून एमआर 1 चे 117 आणि एमआर-2 चे शुक्रवारी महिने 9 ते 5 वर्षे वयोगटातील 168 बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 2024 बालकांन डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
आणखी 14 संशयित बालके आढळून आली
शुक्रवारी मिसारवाडीत दोन, नारेगावमध्ये चार, औरंगपुरा, जुनाबाजार, भवानीनगर, गरमपाणी, कैसर कॉलनी, नेहरूनगर, बायजीपुरा (प्रत्येकी 1) अशी 14 संशयित बालके आढळून आली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून...
औरंगाबाद शहरात वाढत्या गोवर रुग्णांची संख्या पाहता महानगरपालिकेची आरोग्य प्रशासन कामाला लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण केले जात आहे. सोबतच 9 महिने ते पाच वर्षे वयातील मुलांचं लसीकरण केले जात आहे. तर ज्या भागात संशयीत मुलं आढळून येत आहेत, त्या भागात विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोबतच आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे.
भारतासोबतच जगातील प्रत्येक देशांमध्ये गोवरचा धोका
एका आकडेवारीनुसार 2021 मध्ये जगभरात गोवरची अंदाजे 9 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली होती. तर यावेळी 1,28,000 मृत्यू झाले होते. तसेच 22 देशांना गोवरच्या मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागला. कोरोनामुळे गोवर लसीकरणात आलेल्या अडथळे पाहता 2022 मध्ये गोवरचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतासोबतच जगातील प्रत्येक देशांमध्ये गोवरचा धोका आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )