Ahmednagar Shradha Gunjal : संगमनेर शेतकऱ्याच्या मुलीची सातासमुद्रापार भरारी; Aerospace प्रशिक्षणासाठी भारतातून निवड...
Ahmednagar Shradha Gunjal : संगमनेर तालुक्यातील श्रद्धा गुंजाळला युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
Ahmednagar Shradha Gunjal : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील (Sangmenr) अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने साता समुद्रापार भरारी घेतली आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्रद्धा गुंजाळ हीने नासात (NASA) घेतलेल्या प्रशिक्षणानंतर ESA ने मंजुरी दिलेल्या AATC या संस्थेमार्फत निवड झाली. विशेष म्हणजे भारतातून निवड झालेली श्रद्धा ही एकमेव भारतीय आहे.
संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर वसलेल्या खांडगावात भगवान गुंजाळ (Shrdhha Gunjal) हे अल्पभूधारक शेतकरी पत्नी रोहिणी, मुलगी श्रद्धा व मुलगा साई यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी श्रद्धा ही अभ्यासात हुशार असल्याने तिच्या आई-वडीलांनी तिला प्रोत्साहन दिलं. बालपणापासूनच अंतराळाबद्दल प्रचंड कुतूहल आणि आकर्षण असलेल्या श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. घरात मार्गदर्शन करणारे कोणी नसल्याने अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक माहिती वृत्तपत्रे व इंटरनेटच्या माध्यमातून जमवून तिने माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेरच्या सह्याद्रीच्या संस्थेत घेतले. स्वप्नपूर्तीचा पुढचा टप्पा सर्वच पातळ्यांवर कठीण होता. आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात शिक्षणासाठी इतका खर्च करून बाहेर कशाला पाठवायचे, तिच्या कमाईचा तुम्हाला काय उपयोग, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पचवून आई-वडिलांनी ठाम भूमिका घेतली आणि मुलीला शिक्षणात काही कमी पडू दिले नाही.
श्रद्धाने मिळवलेल्या यशाने आई वडील आंनदी झाले असून आपल्या मुलीने देशाची सेवा करावी हे सांगताना अश्रू अनावर झाले होते. श्रद्धाने बालपणापासून कल्पना चावलाला रोल मॉडेल ठेवत हवं साध्य केल आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉईड सर्च कॅम्पेनमध्ये सहभाग घेत तिने पृथ्वीच्या दिशेने येणारा घातक ॲस्ट्रॉईड शोधला. या संशोधनाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस व डॉ. अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस हे दोन सन्मान तिला मिळाले आहे. यातूनच 'नासा'च्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅमसाठी केनेडी स्पेस सेंटर येथे तिची निवड झाली.
मुख्यमंत्र्यांकडूनही शुभेच्छा
ESA ने मंजुरी दिलेल्या AATC या संस्थेमार्फत निवड झाली असून यात इटली, स्वित्झरलँड, जर्मनी, यूएसए, रशिया व भारत या सहा देशांचा समावेश आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावर जाणाऱ्या यानांचा अभ्यास व त्यातील सिम्युलेटर्सवर काम करायची संधी तिला मिळणार आहे. तिच्या यशाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत.