Maharashtra Rain : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
Maharashtra Rain : नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
Ahmednagar Rain : अकोले तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
अकोले तालुक्यातील आढळा विभागातील समशेरपूर, टाहाकारी, सावरगाव पाटसह परिसरात आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटसह अतिवृष्टी झाली. गारपीट आणि अतिवृष्टीमुळं या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनानं तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
नाशिक जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. नाशिकच्या सटाणा डांगसौंदाणे परिसरात पुन्हा गारपीट झाली आहे. सटाणा तालुक्यातील अंबासन, मोराणे, सारदे, बिजोरसे शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अनेक वीजेचे खांब आमि झाडे उन्मळून पडली आहेत. या पावसामुळं शेतातील कांद्याचे अतोनात नुकसान झालं आहे. नाशिक ग्रामीणमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मनमाड, नांदगाव भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
राज्यात विविध ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान
सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: