एक्स्प्लोर
Mhorkya Movie Review | समाजभान आणणारा म्होरक्या
सरळ साधी गोष्ट आहे. त्याची मांडणीही नेटकी आहे. यात जान आणली आहे ती छायांकनाने. सिनेमाच्या अनेक फ्रेम्स या खूप काही बोलून जातात. हे त्याचं बलस्थान आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे नेहमी मानाचं असतं. म्हणूच अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट थिएटरवर कधी लागतोय याची उत्सुकता असते. म्होरक्या हा असाच. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच शिवाय त्यात काम करणाऱ्या दोन मुलांनाही गौरवण्यात आलं. बार्शीच्या दिग्दर्शक अमर देवकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन-लेखन केलं आहे. पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शकाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवल्याने आनंद आहेच. तोच सिनेमा आता थिएटरवर लागतो आहे.
जातीय व्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे चटके शालेय स्तरापसूनच बसू लागतात. अशाच एका मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळ मुलाची ही गोष्ट आहे. मुलाचा आवाज कडक आहे. शाळेत प्रजासत्ताक दिन जवळ आहे. या दिनानिमित्त शाळेत परेड शिकवली जाते आहे. या परेडचं नेतृत्व करायची इच्छा या मुलाची आहे. पण त्यात अडसर आहे गावातल्या एका राजकीय वलय असलेल्या मुलाचा. दोघेही लहानच. पण शिक्षकांपासून मुलांपर्यंत झुकतं माप या राजकीय वलय ज्याच्या वडिलांना आहे त्याला. मग अशावेळी या गरीब मुलानं करावं तरी काय? हा मुलगा शेवटी परेड शिकतो कशी.. तो नेतृत्व करतो कसा.. काय होतं नेमकं.. याची ही गोष्ट म्होरक्या.
अमर देवकर यांचा हा पहिला सिनेमा आहे. त्यातही सगळे कलाकार नवीन. त्यांच्याकडून नव्या पद्धतीनं जबरदस्त काम करुन घेतलंय हे विशेष कौतुकास्पद आहे. सिनेमातले ग्रामीण बाज असणारे संवाद लक्षात राहण्याजोगे आहेत. सगळे कलाकार नवीन असून देखील त्यांचा अभिनय मात्र सहज आणि सुंदर असा आहे. मुख्य कलाकार रमण देवकर असो वा दिग्दर्शक अमर देवकर यांनी साकारलेली भूमिका असो किंवा एकूणच सिनेमातलं प्रत्येक पात्र इथं सहज वावरताना दिसतं.
सरळ साधी गोष्ट आहे. त्याची मांडणीही नेटकी आहे. यात जान आणली आहे ती छायांकनाने. सिनेमाच्या अनेक फ्रेम्स या खूप काही बोलून जातात. हे त्याचं बलस्थान आहे. फक्त मुळात सिनेमाच्या कथेचा आवाका लहान आहे. त्यामुळे सिनेमा संथावतो. संवाद छान आहेत. विशेषत: येड्याचा संवाद, गणतंत्रचा झालेला अपभ्रंश हे गमतीदार आहे.
अमर देवकर, रमण देवकर यांची काम उत्तम. म्हणून या सिनेमाला मिळताहेत 3 स्टार्स.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement