एक्स्प्लोर

म्होरक्या राहिला मागे! शुक्रवारऐवजी शनिवारी प्रदर्शित होणार चित्रपट

अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्या चित्रपट आज म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणास्तव हा म्होरक्या आता उद्या प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : म्होरक्या म्हणजे काय? म्होरक्या म्हणजे जो वाट दाखवतो तो. जो नेतृत्व करतो तो. अमर देवकर दिग्दर्शित म्होरक्या चित्रपटाने 2018 मध्ये मराठी चित्रपटांचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. आता दोन वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. 24 जानेवारीला रिलीज होणारा चित्रपट पुढे ढकलला गेला आणि त्याची तारीख सात फेब्रुवारी ठरली. याच दिवशी मेकअप, मलंग, शिकारा आदी चित्रपट प्रदर्शित होताहेत. पण या शर्यतीत म्होरक्या मागे पडला आहे. उद्भवलेल्या अडचणी योग्य वेळात सोडवता न आल्याने शुक्रवारी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता शनिवारी प्रदर्शित होणार आहे. अमर देवकर दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. बार्शी आणि परिसरात राहणाऱ्या तरूणांनी हिमतीने हा चित्रपट तयार केला आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सिनेमाबद्द्ल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. परंतु, आता एक नवी अडचण निर्माण झाली. दिग्दर्शक देवकर यांनी फेसबुकवरून आपल्या चित्रपटाला शुक्रवारी एकही शो मिळत नसल्याची माहीती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'व्यवस्थे'ला दोषी धरलं आहे. याबद्दल माझाशी बोलताना दिग्दर्शक देवकर म्हणाले, 'आमचा चित्रपट ऐसपैस यांनी प्रस्तुत करायचं ठरवलं. त्यानुसार सिनेमाची डीसीपी आवश्यक प्रोजेक्टर कंपन्यांकडे दोन ते तीन दिवस आधी पोचणं आवश्यक होतं. ती डीसीपी मिळाल्यानंतर तो सिनेमा अपलोड करता येतो. त्यानंतर तो दाखवला जातो. पण आता प्रस्तुतकर्त्यांनी ही डीसीपी योग्य वेळेत पोचवली नाही. त्यामुळे सिेनेमा अपलोड झाला नाही. आता शुक्रवारी हा सिनेमा अपलोड होईल आणि शनिवारी दिसेल. केवळ नियोजनातल्या हलगर्जीपणामुळे सिनेमाला हा फटका बसला असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.' म्होरक्या राहिला मागे! शुक्रवारऐवजी शनिवारी प्रदर्शित होणार चित्रपट आनंद शिंदेंचा नवा अंदाज, म्होरक्या चित्रपटासाठी पहिल्यांदाच गायलं रॅप  ऐसपैस या बॅनरच्या प्रस्तुतकर्त्यांपैकी एक अभिराम जोशी यांच्याशीही माझाने संपर्क साधला, तर ते म्हणाले, 'सात तारखेपासून आम्ही थिएटर बुकिग्ज केले आहेत. पण आपल्याला थिएटर्सच कमी मिळाली. डीसीपीमध्येही काही तांत्रिक गोष्टींची अडचण होती. त्या सोडवता सोडवता उशीर झाला. आम्ही या गोष्टी लवकर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत होतो. पण ते होऊ शकलं नाही. म्हणून आज सिनेमा थिएटरवर लागला नाहीय. शनिवारपासून सर्व गोष्टी सुरळीत होतील.' Mhorkya | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक झाला मनोरुग्ण? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Joshi On Namrata Shirodkar: महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...
महेश मांजरेकरांमुळे मिळालेला पहिला हिंदी सिनेमा, हिरोईन नम्रता शिरोडकर... घाबरलेला मराठीचा स्टार अभिनेता; म्हणाला...
Riteish deshmukh On farah Khan: 'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
'फराहबरोबर आधी काम कर आणि मगच तुझं मत बनव' प्राजक्ता कोळीला रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला...
Mrutyuchakra Trailer Released: 'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
'या चक्रात जो अडकतो, तो परत येत नाही...', भीती आणि नियतीचा थरारक खेळ; मराठीतल्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Bigg Boss Marathi Divya Shinde: डॉक्टरांना मारहाण करणं अंगलट आलं! 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेच्या अडचणीत वाढ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
डॉक्टरांना मारहाण करणं अंगलट आलं! 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेच्या अडचणीत वाढ; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
सोमेश्वरच्या निवडणुकीत अजित 'दादाच' फॅक्टर; फोटो न वापरण्याचं पत्र, आता बंडखोर पुरुषोत्तम जगतापांची प्रतिक्रिया
Embed widget