एक्स्प्लोर

Mhorkya Trailer | बहुचर्चित दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या अमर देवकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. याआधी त्यांच्या आयडेंटीटी या शॉर्टफिल्मला देखील प्रचंड वाहवाही मिळाली होती. म्होरक्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

मुंबई : दोन-दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा बहुचर्चित म्होरक्या या मराठी  चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट 24 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे.  65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. उध्वस्त आयुष्याची, विस्कटलेल्या व्यवस्थेची लांबी-रुंदी आणि खोली काही सेकंदातच सांगणारा #म्होरक्याचा ट्रेलर जरूर पाहा, असं या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करताना म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येत असलेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका मेंढपाळ समाजातील मुलाची परेडसाठीची धडपड दिसून येत आहे. यातून समाजव्यवस्थेतील काही गोष्टीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. जो म्होरं (पुढं) नेतो तो म्होरक्या ही या सिनेमाची टॅगलाईन आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  कुठलीही बडी स्टारकास्ट नसलेल्या या सिनेमाची सध्या सोशल माध्यमावर बरीच चर्चा आहे. इथे पाहा ट्रेलर  आनंद शिंदे यांनी पहिल्यांदाच गायलं रॅप लोकसंगीताचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना थिरकायला भाग पाडणारे गायक आनंद शिंदे या चित्रपटाच्या निमित्ताने  नव्या अंदाजात पाहायला मिळाले आहेत. त्यांनी या सिनेमासाठी पहिल्यांदाच रॅप पद्धतीचं गाणं गायलं आहे. या गाण्याविषयी बोलताना आनंद शिंदे म्हणाले की, हे अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. मी लोकगीतं, भीमगीतं आणि अनेक गाणी गायली. हे गाणं लोकगीत असताना देखील वेगळं काहीतरी या गाण्यातून मिळत आहे. या गाण्यातून वेगळा आनंद मला मिळाला आहे. हा मान मला मिळाला आहे याबद्दल मी म्होरक्या टीमचा आभारी आहे. पोपटापासून आतापर्यंत प्रेम दिलं  तसंच या गाण्यालाही द्या असं आवाहन आनंद शिंदे यांनी केलं आहे. कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी हे गीत लिहिलं आहे तर संगीत वैभव शिरोळे यांचं आहे. हेही वाचा-  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पोस्टाने घरपोच, 'म्होरक्या'च्या दिग्दर्शकाने पोस्टमनचे केले आदरातिथ्य या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत. गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी पुरस्कार न स्वीकारणाऱ्यांमध्ये अमर देवकर हे आघाडीवर होते. विशेष म्हणजे देवकर यांचा म्होरक्या हा पहिलाच चित्रपट असून त्यांच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार न स्वीकारल्याने त्यांना हे पुरस्कार अखेर पोस्टाने घरपोच मिळाले होते यावेळी त्यांनी पोस्टमन राहुल पवार यांचा भरपोशाख देऊन सन्मान केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget