Wild Wild Punjab Review : हृदयाच्या जखमेवर मनोरंजनाची सुखकारक फुंकर
Wild Wild Punjab Review : . तुम्हाला खूपच उदास वाटत असेल, कंटाळा आला असेल तर तुम्ही हा वाइल्ड वाइल्ड पंजाब चित्रपट पाहू शकता.
सिमरप्रीत सिंग
वरुण शर्मा, जस्सी गिल, पत्रलेखा, मनजोत सिंह, सनी सिंह, इशिता राज,
Netflix
Wild Wild Punjab Review : तुमचे हृदय कधीतरी तुटले असेल, तुम्ही तुमच्या हृदयाच्या दुखण्यावर इलाज शोधत आहात आणि तुम्ही सोशल मीडियावर दुःखी रिल्स पहात आहात, आणि तेच तुमच्या फीडमध्ये येत आहेत. तुम्हाला खूपच उदास वाटत असेल, कंटाळा आला असेल तर तुम्ही हा वाइल्ड वाइल्ड पंजाब चित्रपट पाहू शकता. या चित्रपटांमुळे मनाच्या वेदनांवर मजेदार पद्धतीने उपचार होतील आणि चांगले मनोरंजनही होईल.
> चित्रपटाची कथा काय?
राजेश खन्ना म्हणजेच वरुण शर्मा म्हणजेच खन्ने याचं हृदय तुटलं आहे. त्याला त्याच्या प्रेयसीला I am over you...तू नरकात गेलीस तरी चालेल एवढं बोलायचे आहे. हे बोलण्यासाठी त्याला त्याचा मित्र सनी सिंह, जस्सी गिल आणि मनजोत सिंह हे सगळे साथ देतात आणि पठाणकोटसाठी निघतात. या प्रवासात काही वाइल्ड गोष्टी होतात. नशेत एक लग्नही होते आणि सोबत अशाच काही गोष्टी घडतात. नेमकं काय घडतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
> चित्रपट कसा आहे ?
हा चित्रपट फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित आहे आणि तो म्हणजे मनोरंजन. चित्रपट सुरुवातीपासूनच मुद्द्यावर येतो आणि एकामागून एक मजेदार ट्विस्ट येतात. चित्रपटात काही मजेदार सीन्स येतात ज्यामुळे तुमचे मनोरंजन होते. अनेक कॉमिक सीन्स तुम्हाला खूप हसवतात, परिस्थिती अशा प्रकारे तयार केली जाते की तुम्ही स्वतः हसता. हा चित्रपट सांगतो की मित्र ही जीवनातील सर्वोत्तम गोष्ट आहे आणि मित्रांसोबत सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. हा चित्रपट मजेशीरपणे तुमच्या मनाचा थकवा, उदासीनता दूर करतो.
> कलाकारांचा अभिनय ?
या चित्रपटातील सर्व पात्रे महत्त्वाची आहेत. सर्वच कलाकारांनी कमाल काम केले आहे. वरुण शर्माने राजेश खन्ना यांची भूमिका अतिशय निरागसपणे साकारली आहे. त्याला पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटते. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्या पात्राला काय म्हणायचे आहे हे समजेल.
सनी सिंग खूप माचो आहे आणि तो अप्रतिम दिसतो आणि त्याने त्याचे कॅरेक्टर अगदी परफेक्शनने साकारले आहे. त्याचे कॉमिक टाइमिंग देखील चांगले आहे. मनजोत सिंग एक कठोर सरदार बनला आहे, त्याला पाहण्यात मजा आहे, येथे तो वेगळा दिसतो आणि गोठलेला आहे, तो त्याच्या पद्धतीने मनोरंजन करतोय. जस्सी गिल हा आपल्या वडिलांचा लाडका मुलगा आहे. पण, त्याच्या मनात वडिलांचा धाक आहे. ही भीती त्याने आपल्या अभिनयातून चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. वडिलांच धाक मनात असणारे अनेकजण या पात्राशी स्वत:ला रिलेट करू शकतील. पत्रलेखाने खूप प्रभावित केले आहे. तिने दमदार अभनिय केला आहे. इशिता राजने उत्कृष्ट काम केले आहे.
दिग्दर्शन कसे आहे?
सिमरप्रीत सिंगने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, त्याने एक महत्त्वाचा मुद्दा ज्या मनोरंजक पद्धतीने मांडला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. गंभीर मुद्देही मनोरंजनाच्या माध्यमातून मांडता येतात असे दाखवून दिले आहे. चित्रपटात आणखी थोडे कॉमेडी पंच असते तर आणखी मज्जा आली असती.