Women Health: महिलांनो...ब्रेस्ट कॅन्सरमध्ये फक्त गाठच नाही, तर 'या' छुप्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करणं पडेल महागात, डॉक्टर म्हणतात...
Women Health: स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ असणे, मात्र ही लक्षणंही दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत.. जाणून घ्या...
Women Health: भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. त्याचा उच्च मृत्युदर हा सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर चिंतेचा विषय बनतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जरी स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ असणे, हे सामान्य असले तरी इतरही काही लक्षणं आहेत. जी दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत. जाणून घ्या..
सार्वजनिक आरोग्य चिंतेचा विषय
भारतातील स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि त्यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे, ज्यामुळे तो गंभीर सार्वजनिक आरोग्य चिंतेचा विषय बनतो. ऑक्टोबर महिना स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता म्हणून साजरा केला जात असल्याने याबाबत नियमित तपासणीवर भर देणंही तितकंच गरजेचं आहे.
2045 पर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या ICMR अभ्यासानुसार, 2045 पर्यंत भारतात स्तनाच्या कर्करोगाचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. ICMR च्या मते, 2022 मध्ये भारतातील एकूण महिला कॅन्सरपैकी 28.2 टक्के स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण होते. स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी 5 वर्षांचा जगण्याचा दर 66.4 टक्के आहे. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार दिल्लीतील एम्स हॉस्पिटलचे डॉ. अभिषेक शंकर यांच्या मते, ''स्तनातील कर्करोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये स्तनामध्ये गाठ, काखेच्या किंवा मानेजवळ सूज येणे, स्तनाग्रातून स्त्राव, त्वचेचा रंग खराब होणे अशा लक्षणांचा देखील समावेश होतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सुरुवातीच्या टप्प्यावर कर्करोगाचा शोध घेतल्यास उपचारांचे परिणाम सुधारू शकतात, तसेच रुग्णांचे आयुर्मान वाढू शकते.
स्तनाचा आकार आणि स्तनाग्रात बदल
- त्वचा किंवा स्तनाग्र लालसर होणे,
- स्तनाग्र आतील बाजूस वळणे,
- स्तनाच्या आकारात बदल होणे
- स्तन दुखणे ही देखील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात, असे डॉक्टर स्पष्ट करतात.
मॅमोग्राफीद्वारे वेळेवर तपासणीचे महत्त्व
मॅमोग्राफी ही स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि सुरुवातीच्या टप्प्यावर निदान करण्यासाठी सर्वात स्टॅंडर्ड चाचणी आहे, जी मृत्यू दर कमी करण्यास मदत करते. 2024 मधील यूएस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वयाच्या 40 व्या वर्षापासून प्रत्येक 2 वर्षांनी मॅमोग्राफीची शिफारस केली जाते. बऱ्याच वेळा स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतात, म्हणून मॅमोग्राफी किंवा स्तन एमआरआयद्वारे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. "यामुळे मृत्युदर 30 टक्क्यांहून अधिक कमी होतो."
या तपासणीद्वारे लवकर ओळखणे शक्य
स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी स्तनाची स्व-तपासणी आणि क्लिनिकल तपासणी देखील महत्त्वाची आहे. नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस (NP-NCD) अंतर्गत समुदाय स्तरावर क्लिनिकल चाचणीचा अवलंब केला जात आहे.
स्तनाच्या कर्करोगाचा धोका कसा कमी करायचा?
- काही जोखीम घटक बदलल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करणे शक्य आहे.
- यामध्ये उशीरा विवाह, उशीरा बाळंतपण, मूल न होणे आणि तोंडी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यांचा समावेश होतो.
- हार्मोनल टॅब्लेटसह केमोप्रोफिलॅक्सिस उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असू शकते,
- परंतु संभाव्य दुष्परिणामांमुळे सामान्यतः शिफारस केली जात नाही.
हेही वाचा>>>
Women Health: काय सांगता! उशीरा गर्भधारणेमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? सुरुवातीची लक्षणे कोणती? कसा वाढतो धोका? तज्ज्ञ काय म्हणतात?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )