Women Health: महिलांनो.. मेनोपॉजला उशीर झाला, तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो? 'या' सवयी लगेच बदला
Women Health: काही महिलांना लवकर मेनोपॉजचा सामना करावा लागतो. तर उशीरा मेनोपॉज आल्याचाही महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तज्ज्ञ काय सांगतात?
Women Health: ते म्हणतात ना... जन्म बाईचा...खूप घाईचा.. रजोनिवृत्ती ही एक सामान्य प्रक्रिया आहे ज्यातून सर्व महिला जातात. रजोनिवृती.. ज्याला इंग्रजीत मेनोपॉज असेही म्हणतात रजोनिवृत्ती हा 12 महिन्यांचा कालावधी मानला जातो, ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते आणि नंतर मासिक पाळी थांबते. मेनोपॉजची सुरुवात साधारणपणे 50 वर्षांच्या आसपास मानली जाते. परंतु काही महिलांना या वयाच्या आधी लवकर मेनोपॉजचा सामना करावा लागतो. तर काही स्त्रिया अशा आहेत ज्यांना खूप उशीरा मेनोपॉज येतो. याला लेट मेनोपॉज म्हणतात. उशीरा रजोनिवृत्तीचाही तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे आणि या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे.
मेनोपॉज साधारणपणे कोणत्या वयात येतो?
हेल्थशॉर्ट वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूजा शर्मा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सलग 12 महिने मासिक पाळी न येणे याला रजोनिवृत्ती म्हणतात. ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. रजोनिवृत्ती साधारणपणे 50 ते 51 वर्षे वयात येते. शस्त्रक्रियेद्वारे अंडाशय काढून टाकल्यास किंवा इतर काही प्रकरणांमध्ये, हे बदल वयाच्या आधीच शरीरात होतात. रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे शरीरावर पुरळ, लठ्ठपणा, घाम येणे आणि मूड बदलणे यासह अनेक लक्षणे दिसतात. काही महिलांना या वयाच्या आधी लवकर रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतो. लवकर रजोनिवृत्तीप्रमाणे, उशीरा रजोनिवृत्तीचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
या सवयी मेनोपॉजच्या वयावर परिणाम करतात
- NIH संशोधनानुसार, ज्या महिला अल्कोहोलचे सेवन करतात, त्यांना मेनोपॉज इतरांपेक्षा थोड्या उशिरा येतो.
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आणि विलंबित मेनोपॉज यांच्यातही एक संबंध आढळून आला आहे. तज्ज्ञांच्या मते, या गोळ्यांमुळे मेनोपॉजची लक्षणे फार प्रभावीपणे दिसून येत नाहीत.
- मांसाहार करणाऱ्या महिलांना मेनोपॉज उशिरा येण्याची शक्यता असते.
- व्हिटॅमिन बी 6, झिंकचे जास्त सेवन आणि तेलकट मासे किंवा ताज्या भाज्यांचे जास्त सेवन यामुळे सहा महिने ते तीन वर्षांचा विलंब होऊ शकतो.
- खाण्यापिण्याच्या अनियमिततेमुळे हा त्रास होतो. ज्या स्त्रिया जास्त धूम्रपान करतात, रिफाइंड पास्ता आणि तांदूळ यांसारखे कार्बोहायड्रेट खातात त्यांना लवकर मेनोपॉज होऊ शकतो.
उशीरा रजोनिवृत्तीसाठी 'या' गोष्टीही कारणीभूत
अनुवांशिकपणा - पहिला जोखीम घटक आनुवंशिकता मानला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, उशीरा रजोनिवृत्तीच्या मागे अनुवांशिक कारणे देखील दिसतात. जर आईला रजोनिवृत्तीला उशीर झाला असेल तर मुलीलाही रजोनिवृत्ती उशिरा येण्याची शक्यता वाढते. उशीरा रजोनिवृत्तीच्या अनियमिततेच्या प्रकरणांपैकी निम्मी प्रकरणे अनुवांशिकतेशी संबंधित असल्याचे आढळून येते.
इस्ट्रोजेन पातळी - शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. यामुळेच लठ्ठ महिलांना उशीरा रजोनिवृत्तीचा त्रास होण्याची शक्यता असते. वास्तविक, चरबीच्या ऊती इस्ट्रोजेन तयार करतात आणि साठवतात. यामुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होण्यास वेळ लागतो आणि रजोनिवृत्तीला विलंब होतो.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळी चुकली? किती उशीरानं पाळी येणं सामान्य? गर्भधारणा व्यतिरिक्त, ही 3 कारणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )