(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Health: मासिक पाळी चुकली? किती उशीरानं पाळी येणं सामान्य? गर्भधारणा व्यतिरिक्त, ही 3 कारणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत
Women Health: कधीकधी मासिक पाळी वेळेवर न येणे, हे केवळ गर्भधारणेमुळेच नाही तर आरोग्याशी संबंधित कारणांमुळे देखील असू शकते. जाणून घ्या...
Women Health: मासिक पाळी हे प्रत्येक महिलेसाठी निसर्गाचे वरदान समजले जाते. मात्र कधी कधी दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीमुळे अनेकदा महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशात कधी पाळी चुकली, तर आणखीच ताण वाढत जातो. त्यात पण पाळी येण्यास जर उशीर झाला किंवा चुकला तर ही देखील एक मोठी समस्या असू शकतो. ज्यामुळे प्रत्येक मुलीला याचे टेन्शन येणे स्वाभाविक असते. कधीकधी मासिक पाळी वेळेवर न येणे हे केवळ गर्भधारणेमुळेच नाही तर आरोग्याशी संबंधित कारणांमुळे देखील असू शकते. जाणून घ्या..
अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
महिलांमध्ये मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे प्रत्येक मुलीला दर महिन्याला या समस्येला सामोरे जावे लागते. आजकाल महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काहींसाठी हे दिवस खूप कठीण आहेत. कारण यामध्ये पोटदुखी, मूड चेंज अशा समस्यांना सामोरे जावे लागते. दर महिन्याला येणारी मासिक पाळी उशिरा आली किंवा चुकली तर बहुतेक स्त्रिया त्याचा संबंध गर्भधारणेशी जोडतात. पण असे नाही, कधी कधी शरीरात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांमुळे काही आजारही होऊ शकतात. यापैकी, जर तुम्ही मासिक पाळीच्या विलंबाचा संबंध गर्भधारणेशी जोडत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला मासिक पाळी न येण्यामागील कारण सांगेल आणि तुमचा गोंधळही दूर करेल.
जाणून घ्या मासिक पाळी उशीरा येण्याची 5 कारणे आणि उपाय.
मासिक पाळीत विलंब किती सामान्य आहे?
जर महिलांमध्ये मासिक पाळी 21 ते 30 दिवसांपर्यंत चालत असेल तर त्याला सामान्य म्हणतात. प्रत्येक मुलीची मासिक पाळी वेगळी असते. शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते 6 आठवडे किंवा त्याहून अधिक असल्यास, याचा अर्थ मासिक पाळी चुकली आहे.
कधीकधी मासिक पाळी वेळेवर न येणे, हे केवळ गर्भधारणेमुळेच नाही तर आरोग्याशी संबंधित कारणांमुळे देखील असू शकते. जाणून घ्या...
हेही वाचा>>>
Women Health: गरोदर महिलांच्या 'या' चुकांमुळे बाळाचा चेहरा बिघडू शकतो? गर्भावर होतो परिणाम? अभ्यासात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )