Travel : काम तर रोजचंच आहे.. व्यस्त जीवनातून स्वत:साठी वेळ काढा! भारतीय रेल्वे ऑगस्टमध्ये देतेय 'या' सुंदर देशात फिरण्याची संधी
Travel : स्वच्छ समुद्रकिनारे.. सुंदर मंदिरं.. अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला कोणाला आवडणार नाही? त्यासाठी धकाधकीच्या जीवनातून स्वत:साठी थोडा ब्रेक घेतला पाहिजे.
![Travel : काम तर रोजचंच आहे.. व्यस्त जीवनातून स्वत:साठी वेळ काढा! भारतीय रेल्वे ऑगस्टमध्ये देतेय 'या' सुंदर देशात फिरण्याची संधी Travel lifestyle marathi news In August Indian Railways offering a chance to travel around the country at a low cost Travel : काम तर रोजचंच आहे.. व्यस्त जीवनातून स्वत:साठी वेळ काढा! भारतीय रेल्वे ऑगस्टमध्ये देतेय 'या' सुंदर देशात फिरण्याची संधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/c0323fb416e07a4a0e9545d42868b2dd1719023323755381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Travel : काम काय रोजचंच असतं.. धकाधकीच्या जीवनातून स्वत:साठी थोडा ब्रेक घेतला पाहिजे, आणि आयुष्यात एकदा तरी स्वच्छंदी होऊन फिरता आलं पाहिजे, कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. स्वच्छ समुद्रकिनारे.. सुंदर मंदिरं.. अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला कोणाला आवडणार नाही? आपल्या सौंदर्यासाठी देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या या देशात वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. कमी बजेट असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण अत्यंत उत्तम आहे. तुम्ही या वर्षी असं ठिकाण एक्सप्लोर करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ऑगस्टमध्ये भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC सोबत योजना बनवू शकत
जगातील अतिशय सुंदर बेट!
आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत. तो देश बाली आहे, जिथे जाण्यासाठी तुम्ही ऑगस्टमध्ये IRCTC सोबत प्लॅन करू शकता. बाली हे इंडोनेशियाचे छोटे पण अतिशय सुंदर बेट आहे, जे स्वच्छ समुद्रकिनारे, मंदिरे, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बाली हे इंडोनेशियातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जर तुम्ही या वर्षी परदेशात जाण्याचा विचार करत असाल, पण तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही बालीला जाण्याचा प्लॅन करू शकता. IRCTC ने अत्यंत कमी खर्चात बालीला भेट देण्याची संधी आणली आहे.
Set off to Bali with #IRCTCTourism for six days of scenic sunsets and explore the unique Balinese culture. Enjoy a seamless trip with meals, accommodation, tickets and more covered in our package.
— IRCTC (@IRCTCofficial) June 18, 2024
Departure Date- 11.08.2024
Package Price - Starting from ₹1,05,700/- per person*… pic.twitter.com/BXXtOzasZJ
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला बालीचे सुंदर दृश्य पहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
पॅकेजचे नाव- Awesome Bali with 4 star accommodation
पॅकेज कालावधी- 6 रात्री आणि 7 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
कधी प्रवास करू शकाल – 11 ऑगस्ट 2024
या सुविधा तुम्हाला मिळतील..
तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइट तिकिटे मिळतील.
मुक्कामासाठी 4 स्टार हॉटेलची सोय असेल.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 1,14,900 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 10,64,00 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 10,57,00 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 10,02,00 रुपये द्यावे लागतील
बेडशिवाय तुम्हाला 92,900 रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा>>>
Travel : Weekend आहे खास, सोबत बहरलेला निसर्ग! पावसात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे फिरायला विसरू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)