एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023: 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर; यंदा गणेश चतुर्थीनिमित्त देऊ शकता भेट

Famous Ganesh Temples: यंदाच्या गणेश चतुर्थीला तुम्ही देशातील काही प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन करु शकता. ही मंदिरं नक्की कोणती आहेत? पाहूया सविस्तर...

Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा हे सर्वांचंच लाडकं दैवत. आराध्यदैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. गणेश चतुर्थीचा (Ganeshotsav 2023) उत्साह केवळ भारतातच नाही, तर जगभरात पाहायला मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध आणि प्राचीन गणेश मंदिरांना भेट देऊ शकता. या निमित्तानं आपण देशातील सर्वात प्रसिद्ध अशा 10 गणपती मंदिरांविषयी जाणून घेऊयात...

1. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई (Siddhivinayak Temple, Mumbai)

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे सिद्धीविनायक. सिद्धिविनायक मंदिर प्रत्येक गणेश भक्ताचं श्रद्धास्थान आहे. अगदी सामान्य माणसांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर 18 व्या शतकात 1801 मध्ये बांधलं गेलं. हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराला ‘नवसाचा गणपती’ असंही म्हटलं जाते. लक्ष्मण विठु पाटील आणि देऊबाई पाटील या दाम्पत्यानं सिद्धीविनायक मंदिर उभारण्यासाठी निधी दिला होता. या मंदिरात देश-विदेशातून अनेकजण नवस करण्यासाठी येतात.

2. दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे (Dagdusheth Halwai Ganpati Temple, Pune)

दगडूशेठ गणपती मंदिराला शतकांहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे. या मंदिरातील बाप्पांची मूर्ती 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद असून ती सुमारे आठ किलो सोन्याने सजलेली आहे. 1800 च्या उत्तरार्धात, प्रसिद्ध मिठाई विक्रेते आणि एक श्रीमंत व्यापारी असलेले दगडूशेठ गडवे यांनी प्लेगच्या साथीने आपला मुलगा गमावला. यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी नैराश्यात गेले, नैराश्यातून मुक्त होण्यासाठी त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराज यांनी त्यांना गणेश मंदिर बांधण्यास सांगितलं. त्याप्रमाणे 1893 मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. समाजसुधारक लोकमान्य टिळक हे दगडूशेठ यांचे जवळचे मित्र होते आणि तिथेच गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना टिळकांच्या मनात आली. त्यानंतर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर प्रसिद्ध झालं.

3. सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा (Titwala Ganpati)

सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे मुंबईजवळ आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा या छोट्याशा गावात स्थित हे गणपती मंदिर आहे. हे टिटवाळा येथे जन्मलेल्या शकुंतलाचे पालक ऋषी कण्व यांच्या आश्रमाचं स्थान मानलं जातं. हे ठिकाण प्राचीन दंतकथेने नटलेलं आहे. मंदिरात स्थापित केलेल्या गणेशमूर्तीची पूजा केल्यास विभक्त विवाहित जोडप्यांना एकत्र केलं जाऊ शकतं आणि इच्छित लोकांचे विवाह सहजपणे निश्चित केले जाऊ शकतात. या विश्वासामुळे मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मंगळवारी या मंदिरात भाविकांची गर्दी असते.

4. गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी (Ganpatipule Temple, Ratnagiri)

गणपतीपुळे मंदिराला पुरातन परंपरा आहे. येथील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून ती 400 वर्षं जुनी आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात सूर्यप्रकाश थेट मूर्तीवर पडेल, अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. गणेशभक्त टेकडीभोवती प्रदक्षिणा घालतात. हे मंदिर समुद्र किनारी वसलं आहे.

5. डोडा गणपती मंदिर, बंगळुरु (Dodda Ganapati Temple, Bangalore)

बंगळुरूपासून 13 किमी अंतरावर बसवनगुडी परिसरात असणारं डोडा गणपती मंदिर फार प्रसिद्ध आहे. डोडा गणपतीच्या मंदिराचं नातं गौडा राज्यकर्त्यांशी जोडलेलं आहे. हे मंदिर सुमारे 500 वर्षांपूर्वी बांधलं गेल्याचं मानलं जातं. दक्षिण भारतातील सर्वात आश्चर्यकारक मंदिरांपैकी एक म्हणजे गणेशाचे डोडा गणपती मंदिर. डोडा म्हणजे मोठा. त्याच्या नावाप्रमाणेच, बंगळूरमध्ये असलेल्या या मंदिरात 18 फूट उंच आणि 16 फूट रुंद गणेशाची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एकाच खडकावर कोरण्यात आली आहे.

6. रणथंबोर गणेश मंदिर, राजस्थान (Trinetri Temple, Ranthambore, Rajasthan)

राजस्थानच्या रणथंबोरमध्ये बांधलेलं हे गणेश मंदिर केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील पहिलं गणेश मंदिर मानलं जातं. या मंदिरात गणेशाची त्रिनेत्री मूर्ती आहे. त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि अरवली डोंगराच्या मधोमध वसलेलं आहे. 1000 वर्षांहून अधिक जुनं हे मंदिर रणथंबोर किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाणी बांधलं आहे. विशेष बाब म्हणजे हे गणेश मंदिर राजस्थानमधील पहिलं मंदिर आहे, जिथे गणपतीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत दिसतं. या मंदिरात गणपतीची पत्नी रिद्धी आणि सिद्धी आणि दोन मुलं शुभ-लाभ देखील आहेत.

7. खजराना गणेश मंदिर, इंदोर (Khajrana Ganesh Temple, Indore)

खजराना गणेश मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. हे मंदिर मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं होतं. खजराना मंदिरात गणेशाची तीन फुटी मूर्ती आहे, ही मूर्ती जवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली.  देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंदिरांमध्ये खजराना मंदिराचे नाव समाविष्ट आहे. येथे भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे येतात आणि गणेशमूर्तीच्या पाठीवर उलटे स्वस्तिक बनवतात आणि भोग अर्पण करून देवाची कृतज्ञता व्यक्त करतात.

8. वरसिद्धि विनयागर मंदिर, चेन्नई (Varasiddhi Vinayagar Temple, Chennai)

चेन्नईमधील बेसंत नगर भागात असलेलं वरसिद्धि विनयगर मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी भव्य गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं, या मंदिरात गरिबांसाठी मोठा भंडारा आयोजित केला जातो. मंदिरात सामाजिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जातं. 

9. मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर (Moti Dungri Ganesh Ji Temple, Jaipur)

जयपूरमधील प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिर सतराव्या शतकात बांधलं गेलं. किल्ले आणि टेकड्यांच्या मध्यभागी वसलेलं हे मंदिर राजस्थानातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील गणेशमूर्ती सुमारे पाचशे वर्षे जुनी आहे.

10. विनायक देवरू मंदिर, कर्नाटक (Vinayak Devru Temple, Karnataka)

कर्नाटक येथे सुमारे 1500 वर्षे जुनं श्री विनायक देवरू मंदिर आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती गोकर्ण मंदिरातील मूर्तीशी मिळतीजुळती आहे. या मूर्तीमध्ये गणेशाच्या एका हातात कमळाचं फूल, तर दुसऱ्या हातात मोदकांची मिठाई आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ganeshotsav 2023: जन्माष्टमीआधीच गणेशोत्सवाची धूम; देशभरात तयारी सुरू, आगमन सोहळेही धडाक्यात, पाहा फोटो

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget