Health Tips : मधुमेह आणि केस गळण्याबरोबरच लठ्ठपणा देखील आनुवंशिक आहे का? तज्ञांचे मत जाणून घ्या
Health Tips : लठ्ठपणा नियंत्रित करणं ही एक आव्हानात्मक बाब आहे. कारण ती व्यक्तीच्या आनुवंशिकता आणि जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे.

Health Tips : वाईट जीवनशैलीमुळे (Lifestyle) जगभरातील लोक लठ्ठपणाचे (Obesity) शिकार होत आहेत. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करणं कठीण जातं. पण, तुम्हाला माहित आहे का की मधुमेह (Diabetes) आणि केस गळती (Hair Fall) प्रमाणेच लठ्ठपणा देखील अनुवांशिक (Genetic) कारणांमुळे असू शकतो. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लठ्ठपणाची समस्या काही लोकांच्या जनुकांमध्ये असते, जी पिढ्यानपिढ्या चालू असते.
याच संदर्भात, नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी म्हणतात की, लठ्ठपणा नियंत्रित करणं ही एक आव्हानात्मक बाब आहे. कारण ती व्यक्तीच्या आनुवंशिकता आणि जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. यामुळेच अशा लोकांना रोज व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, जर तुम्हाला देखील अनुवांशिकदृष्ट्या लठ्ठपणाचा सामना करावा लागत असेल तर त्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
डान्सचा व्यायाम करा
डॉ. प्रियांका रोहतगी सांगतात की, तुमच्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचाली करणे महत्त्वाचे आहे. जे लोक अनुवांशिकदृष्ट्या लठ्ठपणाला बळी पडतात त्यांनी योग्य आहार आणि जीवनशैलीच्या सवयी ठेवाव्यात. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी, तुमच्या दिनचर्येत शारीरिक हालचालींचा समावेश करणं सर्वात महत्त्वाचं आहे. जसे की चालणे, नृत्य करणे, स्ट्रेचिंग इ. 30 मिनिटांच्या डान्स क्लासमध्ये तुम्ही 130 ते 250 कॅलरीज बर्न करू शकता.
खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या
डॉ. प्रियांका रोहतगी म्हणतात की, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींचीही काळजी घेतली पाहिजे. तुमच्या शरीरात आधीच असे घटक आहेत जे लठ्ठपणाच्या अनेक लक्षणांना प्रोत्साहन देतात. फळे आणि भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करावा. यासोबतच प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या गोष्टींपासून दूर राहावे.
भरपूर पाणी प्या
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी करणे सोपे जाईल. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि तुमची भूकही कमी लागते, ज्यामुळे तुम्हाला कॅलरी नियंत्रित राहण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचाही समावेश करावा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
