Fashion : सो ब्युटीफूल! साध्या प्लेन साडीला बनवायचंय डिझायनर साडी? ते ही खर्च न करता? हो... ही बातमी तुमच्यासाठीच आहे
Fashion : तुम्हाला स्टायलिश साड्या आवडतात ना! पण याच साड्या डिझाइन करण्यासाठी पैसे खर्च करायचे नसतील, तर तुम्ही घरी देखील त्या तयार करू शकता..
Fashion : साड्या म्हटलं की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यातही स्टायलिश, डिझायनर साड्या कोणाला आवडत नाहीत? आजकाल बॉलीवूड मध्ये एखादी अभिनेत्री प्लेन पण डिझायनर साडी घातलेली आपण पाहतो ना, तेव्हा आपल्यालाही वाटते की अशी साडी माझ्याकडे असायला हवी, पण डिझायनर साड्या म्हटल्या की थोडे पैसे खर्च करावे लागणार, कारण त्या इतर साड्यांच्या मानाने महाग असतात, त्यामुळे सर्वांनाच परवडणाऱ्या या साड्या नसतात. जेव्हा जेव्हा साड्यांमधले वेगवेगळे डिझाईन्स ट्रेंडिंग (Trending) होतात, तेव्हा त्या विकत घ्याव्या, परिधान कराव्याशा वाटतात. पण इथे आम्ही तुम्हाला अशा भन्नाट हॅकबद्दल सांगणार आहोत. की जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेन डिझायनर साडी घरीच बनवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. यामुळे तुमची साडी चांगली दिसेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल. आपण साधी साडी डिझायनर कशी बनवू शकता ते जाणून घ्या..
डिझायनर साडी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही रंगाची प्लेन साडी घ्यावी लागेल.
मग तुम्हाला एक फॅब्रिक ट्रे घ्यावा लागेल
ज्याद्वारे तुम्ही साडीवर सहज डिझाइन तयार करू शकता.
ज्या रंगात तुम्हाला साडीची डिझाईन तयार करायची आहे, तो रंग खरेदी करा.
यानंतर तुम्हाला गोटा घ्यावा लागेल ज्याच्या मदतीने तुम्ही बॉर्डर डिझाइन तयार कराल.
आपल्याला फॅब्रिक गम देखील लागेल, ज्यामुळे तुम्ही स्टोन आणि मणी लावाल.
यानंतर ती बनवायला सुरुवात कराल.
डिझायनर साडी 'अशी' बनवा
यासाठी सगळ्यात आधी साडीला पाण्याने नीट स्वच्छ करून वाळवावे लागेल.
आता त्यात एक फॅब्रिक ट्रे ठेवा आणि रंगाच्या मदतीने डिझाइन तयार करा.
यासाठी तुम्ही ब्रश किंवा इअरबड्स वापरू शकता.
तुमची प्रिंट तयार झाल्यावर ते कोरडे होऊ द्या.
यानंतर साडीच्या बॉर्डरसाठी गोटा वापरा.
त्यानंतर गमच्या साहाय्याने त्यावर आरसा जोडा. पण लक्षात ठेवा की ते कोरडे होऊ द्या.
अशा प्रकारे तुमची डिझायनर साडी तयार होईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही साडी खरेदी करता तेव्हा त्यातील फॅब्रिक लक्षात ठेवा.
साडीची लांबी लक्षात ठेवा.
कलर कॉम्बिनेशनची काळजी घ्या, जेणेकरून तुमची साडी सुंदर दिसेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Fashion : एक तर उन्हाळा, त्यात लग्नाचा सीझन, 'Dont Worry!' कूल दिसण्यासाठी लेहेंग्याच्या डिझाईन्स एकदा पाहाच...