एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha: बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती सुरू, 'असा' करा अर्ज
JOB MAJHA : बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय, वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरी या ठिकाणी भरती सुरू आहे.
JOB MAJHA : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Opportunity) शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय, वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरी या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
बँक ऑफ इंडिया
- पोस्ट - प्रोबेशनरी ऑफिसर (क्रेडिट ऑफिसर, IT ऑफिसर)
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंजिनिअरिंग पदवी
- एकूण जागा - 500 (यात क्रेडिट ऑफिसरसाठी 350 आणि IT ऑफिसरसाठी 150 जागा आहेत.)
- वयोमर्यादा - 20 ते 29 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - bankofindia.co.in
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव
- पोस्ट - अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता - आठवी ते दहावी पास
- एकूण जागा - 135
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- वयोमर्यादा - 18 ते 33 वर्ष
- लवकरात लवकर अर्ज करा.
- अधिकृत वेबसाईट - www.msrtc.gov.in
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय, पुणे
- पोस्ट - वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता - MBBS
- एकूण जागा - 49
- मुलाखतीतून निवड होणार आहे.
- मुलाखतीचा पत्ता - वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे- 411037
- मुलाखतीची तारीख - 20 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.esic.nic.in
वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरी
- पोस्ट - पदवीधर प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर, B.Sc.
- एकूण जागा - 40
- नोकरीचं ठिकाण - जळगावातलं वरणगाव
- ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - द जनरल मॅनेजर, ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा जळगाव - 425308
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.ddpdoo.gov.in
भारतीय नौदल ( Indian Navy )
- पोस्ट : ट्रेड्समन स्किल्ड
- शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि ITI
- एकूण जागा : 248
- वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष
- ऑनलाईन पद्धतीने ही भरती होत आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
Advertisement