एक्स्प्लोर

Jobs : हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी क्षेत्रात नोकरीमध्ये वाढ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्येही नोकरीची मोठी संधी: नोकरी जॉबस्‍पीकचा अहवाल

Jobs In India : एफएमसीजी उद्योगामधील नोकरीमध्‍ये एप्रिल 2023 च्‍या तुलनेत या महिन्‍यात 11 टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, याचे श्रेय ग्रामीण भागांमधील वाढत्‍या मागणीला जाते.

मुंबई: हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजीमध्ये नोकऱ्यांच्या संधीत वाढ झाली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स आणि मशिन लर्निंगशी संबंधित नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्क्यांची वाढ झाल्याचं नोकरी जॉबस्पीक इंडेक्समध्ये नोंदवण्यात आलं आहे. 

नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट-कॉलर हायरिंगसाठी प्रमुख रोजगार इंडेक्‍स एप्रिल 2024 मध्‍ये 2643 इतका राहिला. गेल्‍या महिन्‍याच्‍या (मार्च 2024) तुलनेत तो स्थिर राहिला, तर गेल्‍या वर्षीच्‍या एप्रिलच्‍या तुलनेत 3 टक्‍क्‍यांनी घसरला. पण एकूण रोजगार बाजारपेठ भावनेने काही सकारात्‍मक बाबींना दाखवले. जसे हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजी यांसारख्‍या क्षेत्रांनी नोकरीच्या संधीमध्ये वाढ दाखवली. नॉन-मेट्रो शहरांनी मेट्रो शहरांना मागे टाकत आपली प्रबळ कामगिरी कायम ठेवली. तर वरिष्‍ठ व्‍यावसायिकांसाठी मागणी उच्‍च राहिली, ज्‍यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी भूमिकांमध्‍ये उत्तम वार्षिक वाढ झाली. 

नोकरी डॉटकॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी डॉ. पवन गोयल म्‍हणाले, "एकूण इंडेक्‍स स्थिर असले तरी हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजीमध्‍ये नोंद करण्‍यात आलेल्‍या उल्‍लेखनीय नोकरी वाढीसह नवीन आर्थिक वर्षाची सकारात्‍मक सुरूवात झाली आहे. नॉन-मेट्रो शहरे मोठ्या शहरांना मागे टाकत आहेत आणि हे आगामी महिन्‍यांमध्‍ये भारतीय नोकरी बाजारपेठेसाठी उत्तम संकेत आहेत."

हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्‍हल उद्योगातील नोकऱ्यांमध्ये 16 टक्क्यांची वाढ

हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्‍हल उद्योगाने एप्रिल 2023 च्‍या तुलनेत नोकरीमध्‍ये उल्‍लेखनीय 16 टक्‍के वाढीची नोंद केली, ज्‍याचे श्रेय प्रवास व पर्यटनामधील वाढीला जाते. दिल्‍ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्‍या प्रमुख शहरी हब्‍समध्‍ये फ्रण्‍ट ऑफिस मॅनेजर्स, हाऊसकिपिंग सुपरवायजर्स व एफअँडबी सर्विस प्रोफेशनल्‍स यासारख्‍या पदांसाठी मागणी उच्‍च होती.

ऑईल अँड गॅस उद्योगाने एप्रिल 2024 मध्‍ये नवीन रोजगार निर्मितीत वार्षिक 15 टक्‍के वाढीची नोंद केली. विशेषत: अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूर यांसारख्‍या शहरांमध्‍ये पेट्रोलियम इंजीनिअर्स, ड्रिलिंग इंजीनिअर्स व प्रॉडक्‍शन ऑपरेटर्स यासारख्‍या पदांसाठी मागणी सर्वाधिक होती.

एफएमसीजी उद्योगामधील नोकऱ्यांमध्ये 11 टक्क्यांची वाढ

एफएमसीजी उद्योगामधील नोकरीमध्‍ये एप्रिल 2023 च्‍या तुलनेत या महिन्‍यात 11 टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, याचे श्रेय ग्रामीण भागांमधील वाढत्‍या मागणीला जाते. मुंबई, कोलकाता आणि चेन्‍नई यांसारख्‍या शहरांमध्‍ये सेल्‍स मॅनेजर्स, सप्‍लाय चेन एक्झिक्‍युटिव्‍ह्ज व ब्रँड मॅनेजर्स हे सर्वात लोकप्रिय प्रोफाइल्‍स ठरले, ज्‍यामुळे या विकासाला गती मिळाली आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स व मशिन लर्निंगशी नोकऱ्यांमध्ये 19 टक्क्यांची वाढ

एप्रिल 2024 मध्‍ये आयटी उद्योगाने वार्षिक 2 टक्‍क्‍यांची माफक वाढ पाहिली, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स व मशिन लर्निंगशी संबंधित पदांची गती कायम राहिली, ज्‍यांनी गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत हायरिंगमध्‍ये 19 टक्‍के वाढीची नोंद केली. मिनी-मेट्रो शहरांनी चमकदार कामगिरी केली, तर मेट्रो शहरांची गती स्थिर राहिली. अहमदाबाद (वार्षिक 10 टक्‍क्‍यांहून अधिक) व वडोदरा (8 टक्‍क्‍यांहून अधिक) यासारखी नॉन-मेट्रो शहरे नोकरीचे हॉटस्‍पॉट्स म्‍हणून उदयास आले, तर दिल्‍ली-एनसीआर, मुंबईपुणे यांसारख्‍या मेट्रो शहरांमध्‍ये स्थिर नोकरी ट्रेण्‍ड्स दिसण्‍यात आले. 

अनुभवी व्‍यावसायिकांसाठी मागणी उच्‍च राहिली, जेथे 13 ते 16 वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्‍या उमेदवारांसाठी पदांमध्‍ये वार्षिक 9 टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि 16 वर्षांहून अधिक काळाचा कामाचा अनुभव असलेल्‍या उमेदवारांसाठी नोकरीमध्ये उल्‍लेखनीय 21 टक्‍क्‍यांची वाढ झाली. पण, अनुभवी व्‍यावसायिकांसाठी प्रबळ मागणीच्‍या तुलनेत एण्‍ट्री-लेव्हल नोकरीची मागणी कमी राहिली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशाराSpecial Report Sharad Pawar : जयंत पाटील अजितदादांची भेट, संजय राऊतांचा थयथयाट, नेमकं शिजतंय काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget