
Jobs Majha : मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी, फक्त 'ही' पात्रता हवी, पगार दोन लाखांपेक्षा जास्त
Job Majha : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती...

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने व्यवस्थापकासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. तुम्ही 14 मार्च 2022 पासून ऑनलाइन अर्ज करू शकता. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 निश्चित करण्यात आली आहे. या भरती (HPCL रिक्रूटमेंट 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 25 पदांची भरती केली जाईल.
- ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : 14 मार्च 2022
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022
रिक्त जागांचा तपशील
मुख्य व्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक - इंजिन : 01
मुख्य व्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक-गंज संशोधन : 01
मुख्य व्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक - क्रूड आणि इंधन संशोधन : 01
मुख्य व्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक विश्लेषणात्मक : 02
सहाय्यक व्यवस्थापक/व्यवस्थापक-पेट्रोकेमिकल्स आणि पॉलिमर : 03
सहाय्यक व्यवस्थापक/व्यवस्थापक - इंजिन : 01
सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक : 02
असिस्टंट मॅनेजर/ मॅनेजर- कॅटॅलिस्ट स्केल-अप : 02
वरिष्ठ अधिकारी - पेट्रोकेमिकल्स आणि पॉलिमर : 03
वरिष्ठ अधिकारी इंजिन : 03
वरिष्ठ अधिकारी-बॅटरी संशोधन : 01
वरिष्ठ अधिकारी : 02
वरिष्ठ अधिकारी - निवासी अपग्रेडेशन : 01
वरिष्ठ अधिकारी - क्रूड आणि इंधन संशोधन : 01
वरिष्ठ अधिकारी - विश्लेषणात्मक : 01
पात्रता जाणून घ्या
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य व्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी असणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला ऑनलाइन भेट देऊन तपशील तपासू शकतात.
वयो मर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 27 ते 50 वर्षे दरम्यान असावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : इंडियन बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे इथे नोकरीची संधी, वाचा डिटेल्स
- Job Majha : बँक ऑफ बडोदा, पुणे महापालिका, वसई सहकारी बँकेत भरती सुरू; असा करा अर्ज
- Job Majha : मध्य रेल्वे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि IBM नागपूर येथे नोकरीची संधी, पाहा डिटेल्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
