वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
Walmik karad Surrender : संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले.

Walmik karad Surrender : बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आला. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंके?
प्रकाश सोळंके म्हणाले की, वाल्मिक कराडने शरणागती पत्करली, हे खरंतर सीआयडीचे अपयश आहे. सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकली नाही, कराड यांनी आत्मसमर्पण केलं. परंतु, अजूनही खुनाच्या गुन्ह्यातील तीन प्रमुख आरोपी मोकाट आहेत. त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही. वाल्मिक कराड इतके दिवस कुठे होते? पोलिसांपासून ते अशा पद्धतीने लपून कसे राहू शकले? याचाही तपास सीआयडीने करावा. वाल्मिक कराड शरण आले नसते तर सीआयडीने अजूनही त्यांना किती दिवस पकडले नसते हा देखील चर्चेचा मुद्दा आहे. इथून पुढे तपास निःपक्षपातीपणे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वाल्मिक कराडने शरण होण्यापूर्वी व्हिडिओ केला जारी
दरम्यान, वाल्मिक कराडने सीआयडी कार्यालयात शरण होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करून आपली बाजू मांडली. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की, मी वाल्मिक कराड, माझ्या विरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषाने माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, ती मी भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराडने स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
