एक्स्प्लोर

Suresh Dhas On Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड सीआयडीला शरण, आता सुरेश धस यांचं पुढचं पाऊल, म्हणाले, आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा!

Suresh Dhas On Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड शरण आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

Suresh Dhas On Walmik Karad Surrender: बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) आज सीआयडीसमोर शरण आला. वाल्मिक कराडने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराड 22 दिवसांनंतर समोर आला. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळे दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सीआयडीच्या समोर वाल्मिक कराडला शरण यावं लागलेलं आहे. प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा इतक्या कणखर निर्णय आणि धडाथड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, असं सुरेश धस यांनी सांगितले. पोलिसांनी वाल्मिक कराड शरण येण्यास भाग पाडले. वाल्मिक कराड यांची संपंत्ती जप्त झाली पाहिजे. तोपर्यंत आका जे गुन्हे करत होते..ते उघडे पडणार नाही. सुदर्शन घुले जो प्रमुख आरोपी आहे. ज्याने देशमुख यांना गाडीत खेचून हल्ला केला. राजकारण्यांनी सांगितलं होतं का संतोष देशमुख यांना मारा म्हणून... 2023 मध्ये माझ्या मतदारसंघात ओटू कंपनीच्या अधिकाऱ्यांना असच उचललं होतं. मी परळी पॅटन आणू नका, असं त्यांना बोललो होतो, असं सुरेश धस म्हणाले.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

राजकीय हेतूने आरोप हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले...कशाचा राजकारण आणि कशाचा काय...आम्ही कोणी राजकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्यानंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत असं माझं मत आहे. तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता. अशीच एक घटना ऑक्टोबर 2023 ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती. ओटू कंपनी होती त्या कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते. उचलून चालल्याच्यानंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आणू नका असे मी स्वतः बोललो होतो. आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांचे हिम्मत झाली. त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोचलेले होते. राहिलेल्या दीड कोटी साठीच हे माणसं कोणी पाठवले होते हे आकांनीच पाठवले होते. त्याच्यामुळे आता ऑटोमॅटिकली मला वाटतं ते या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही, असं सुरेश धस यांनी सांगितले. वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सिझ करण्यासंदर्भात आता कोर्टाकडे त्यांनी परवानगी मागितली आहे. यांच्या प्रॉपर्टीज झाल्याच पाहिजेत. अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग सुद्धा अवलंब लागेल, असं सुरेश धस म्हणाले.

आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा...- सुरेश धस

विशेष बाब म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावं. याआधी नक्षली जिल्हा म्हणून त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्विकारलं आहे. त्यामुळे आता आव्हानात्मक जिल्हा म्हणून बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावं, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. आकाच्या आकांवर मी बोललो नाही. त्यांच्या पक्षाचे लोक बोललेल आहेत. आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा, असं त्यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके बोलले आहेत, असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं.  

संबंधित बातमी:

वाल्मिक कराडसोबत परळीमधील दोन नगरसेवकही सीआयडीच्या कार्यालयात पोहचले; ते दोघं नेमके कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget