Bollywood Actress Pregnancy Cheat: "मी प्रेग्नेंट होते अन् माझा नवरा दुसऱ्या महिलेसोबत..."; बॉलिवूड गाजवलं पण, खऱ्या आयुष्यात 'तिला' तिच्याच नवऱ्यानं फसवलं
Zeenat Aman Pregnancy Cheat: प्रेग्नेंट असताना नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, पण ती खचली नाही... पदरात असलेल्या दोन मुलांचा सांभाळ करत तिनं नातं निभावलं, ओळखता का बॉलिवूड गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीला?
Zeenat Aman Pregnancy Cheat: बॉलिवूड (Bollywood) गाजवलं पण खऱ्या आयुष्यात मात्र तिला तिच्याच नवऱ्यानं फसवलं. एक अशी दिग्गज अभिनेत्री जी आजही तिच्या आगळ्यावेगळ्या पण क्लासी स्टाईल स्टेटमेंटमुळे खूप चर्चेत असते. तिचं नाव आहे, झीनत अमान (Zeenat Aman). हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री, आजही त्यांच्या स्टायलिश लूकमुळे त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. जरी त्यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं असलं तरीसुद्धा रिअल लाईफ मात्र अनेक अडथळे, दुःख आणि अडचणींनी भरलेली होती. असं असलं आज ही अभिनेत्री तिचं आयुष्य दिलखुलासपणे जगत आहे. पण एक वेळ अशी आली, जेव्हा ती तिच्या आयुष्यात पूर्णपणे एकटी पडलेली.
दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी मजहर खान यांच्याशी लग्न केलेलं, पण त्यांनंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. याबाबत स्वतः अभिनेत्रीनं खुलासा केलेला. झीनत अमान यांना दोन मुलंही आहेत. झीनत अमान यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबत बोलताना सांगितलं होतं की, त्यांना नंतर लग्न केल्याचा पश्चाताप झालेला. पण, दोन मुलं असल्यामुळे त्यांनी तब्बल 12 वर्ष नातं टिकवलं.
View this post on Instagram
याबद्दल बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, "त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. म्हणूनच मी विचार केला की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो पाळेन. मी ते दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा तो माझ्यासोबत नव्हता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. नंतर, एका मासिकात बातमी आली की, त्यावेळी माझा नवरा दुसऱ्या महिलेसोबत होता आणि ती खरी होती."
View this post on Instagram
यावर पुढे बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, "जेव्हा मला मूल झालं, तेव्हा मला वाटलं की, लग्न संपवावं. या नात्यातून बाहेर पडावं, पण नंतर मला वाटलं की, मुलाला नक्कीच संधी मिळावी. पण जेव्हा माझं मूल 5 वर्षांचं होतं, तेव्हा मी एखादं काम करण्याचा विचार केला. पण मग, माझा पती मजहर आजारी पडला आणि माझा संपूर्ण दिवस त्याची काळजी घेण्यात जायचा."
जीनत अमान यांनी सांगितलं की, "मी इंजेक्शन द्यायला शिकलेले आणि डेसिंग करायलाही शिकलेले. मी 18 महिन्यांपर्यंत त्यांच्यासोबतच राहिली. एवढंच काय तर, मी त्याच्या बॅग्सही बदलल्या. तेव्हा मी पूर्णपणे तुटलेले आणि त्या 12 वर्षांत कुणीच असं नव्हतं की, जे मला येऊन विचारतील की, मी कशी आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :