गुरुमाची एन्ट्री वसुंधराच्या आयुष्यात कोणतं नवं वळण घेऊन येणार? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत मोठा ट्विस्ट
Punha Kartavya Aahe Serial Track : गुरुमाच्या एन्ट्रीनं जयश्रीची चांगलीच तारांबळ उडणार आहे. गुरुमा, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच, आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहेत.
Punha Kartavya Aahe Zee Marathi Serial Track: झी मराठीवरच्या (Zee Marathi) गाजलेल्या 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) मालिकेत एक मोठा धमाका होणार आहे. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांची मालिकेत धमाकेदार एन्ट्री होणार आहे . त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे 'गुरुमा' असं असणार आहे.
गुरुमाच्या एन्ट्रीनं जयश्रीची चांगलीच तारांबळ उडणार आहे. गुरुमा, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच, आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहेत. जयश्री, गुरुमाची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते, तिला अशी अपेक्षा आहे की, वसुंधरा गुरुमाची जबाबदारी पेलू शकणार नाही आणि अपयशी ठरेल. वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते. गुरुमाच्या शिष्यांच आगमन होतं, त्यावेळी वसुंधरा त्यांची काळजीही घेते.
View this post on Instagram
जयश्री आणि तनयाची कारस्थानं सुरूच आहेत. पण वसुंधराची प्रामाणिकता यात उजवी ठरते. तनया, वसुंधरानं गुरुमासाठी तयार केलेलं जेवण बिघडवण्याचा प्रयत्न करते. पण वसुंधराचा खरेपणा आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात. गुरुमा वसुंधराला एक कार्य देतात. त्यांनी दिलेलं हे कार्य तपस्वी कार्य असणार असल्याची माहितीदेखील देतात. तर दुसरीकडे अखिल, एक महत्त्वाची बिझनेसची मिटिंग करत असताना, वसुंधरा आकाशला सांगते की, त्या दिवशीच्या सर्व मिटिंग रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करतेय. यामुळे तणाव निर्माण होतो. त्यावेळी आकाश आणि वसुंधरा याच्यात वाद होतो. वसुंधरा अखेर त्या दिवशीची सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाईन मीटिंग आयोजित करते आणि क्लायंटच्या समस्यांचं निराकरण करते. ऑनलाईन मिटिंगदरम्यान, वसुंधरा चांगल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळते.
दरम्यान, वसुंधराच्या आयुष्यात आलेल्या परीक्षेला कशी सामोरी जाईल? गुरुमाच मन कसं जिंकणार का? हे जाणून घेण्यासाठी झी मराठीवरची 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेचा आजचा भाग नक्की पाहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नितीन देसाईंच्या स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारचं पाऊल, नेमणार सल्लागार