Kalyan Crime: कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला, नेमकं काय घडलं?
Kalyan Crime: कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीचा पाठलाग करुन भयंकर पद्धतीने त्याचा शेवट करण्यात आला. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडलं

कल्याण: कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून करण्यात आला. येथील नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रंजीत दुबे (Ranjit Dube) याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच त्याची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत दुबे आणि रामसागर (Ram Sager) यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवले. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी (Kalyan Police) राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या. (Kalyan Crime news)
या घटनेनंतर रंजीत दुबेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने हा सगळा प्रकार कसा घडला, याचा तपशील सांगितला. राम सागरने माझ्या मोठ्या भावाला मारले. त्याने पहिले माझ्या भावावर गोळी (Gun Firing) झाडली. ती गोळी माझ्या भावाच्या बरगड्यांजवळ लागली. त्यामुळे त्याला थोडीशी इजा झाली. त्यानंतर माझा भाऊ स्वत:ला वाचवण्यासाठी पळत होता. तो इमारतीचे पाच मजले चढून वर आला. त्याला धावताना दम लागल्यामुळे तो लिफ्टजवळ खाली पडला. त्यावेळी राम सागरने माझ्या भावाच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे रंजीत दुबेच्या बहिणीने सांगितले.
काही दिवसांपूर्वी राम सागर याने माझ्या भावाला मारले होते. तेव्हा माझ्या भावानेही त्यांच्या घरी जाऊन राम सागरच्या वडिलांना मारले. पण आता राम सागरने माझ्या भावाचा जीवच घेतला. काही दिवसांपूर्वी गावी जमिनीच्या वादातून (Land Dispute) राम सागर याने माझ्या आई-वडिलांना मारले होते. आता त्याने माझ्या भावालाही ठार मारून टाकले, असे सांगताना रंजीत दुबेची बहीण धाय मोकलून रडत होती. सध्या कोळशेवाडी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून राम सागरच्या चौकशीत आणखी काय माहिती पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
धक्कादायक! आरोपींस अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक; भिवंडीतील प्रकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

