Aabhalmaya Serial : आभाळमाया मालिकेत येणार होता मोठा ट्विस्ट, सचिन खेडेकरांनी सीन्स शूटही केले पण..., मुग्धा गोडबोले यांनी सांगितला किस्सा
Aabhalmaya Serial : आभाळमाया मालिकेत येणाऱ्या एका मोठ्या ट्विस्टविषयी मुग्धा गोडबोले यांनी नुकतच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

Aabhalmaya Serial : झी मराठी वाहिनीवर आभाळमाया (Aabhalmaya Serial) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेने मराठी मालिकाविश्वाच्या सुरुवातीलाच अप्रतिम अशी कामगिरी केली. त्यामुळे मराठी मालिकांना प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग सापडला. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आजही तितकच आवडतं. या मालिकेची गोष्ट, यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे. मालिकेच्या शीर्षकगीताची जादू आजही पाहायला मिळतेय.
आभाळमाया मालिकेचे अनेक किस्से आजही प्रचलित आहेत. आभाळमाया या मालिकेतील आणखी एक किस्सा मुग्धा गोडबोल यांनी सांगितला. आभाळामाया मालिकेत मुग्धा गोडबोलने यांनी देकील एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यातच द के क्राफ्ट या युट्युब चॅनलला या मालिकेच्या संपूर्ण टीमने मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मालिकेतील एक किस्सा सांगितला.
मालिकेत येणार होता मोठा ट्विस्ट
आभाळामायाची गोष्ट ही रतनबाई कॉलेजमधील प्राध्यापक सुधा जोशी या शिक्षिकेभोवती फिरते, ज्यांच्या कुटुंबात तिचा पती शरद जो एक प्राध्यापक देखील आहे आणि त्यांना दोन मुली आकांशा आणि अनुष्का आहेत. शरद जेव्हा दुसऱ्या प्रोफेसर चित्राच्या प्रेमात पडतो जिची त्याला चिंगी नावाची एक मुलगी आहे, तेव्हा कुटुंबात तेढ निर्माण होते. पण त्यावेळी मालिकेत सुधा जोशी यांच्या आयुष्यात देखील एक पुरुष आणावा अशी पद्धतीची कल्पना सुचली होती, असं मुग्धा गोडबोले यांनी सांगितलं. त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, त्यासाठी तो काही सीन शूट झाले, जे सचिन खेडेकर यांनी केले होते. पण मालिकेच्या मेकर्सना एक शंका आली. अर्थात त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं आणि मालिकेचे प्रोमोही काही नसायचे. पण शिवाजी पार्कवर जाताना लोकांच्या भावना काय आहेत, याची लक्षात आलं की, जी लोकांच्या मनात एक आदर्श व्यक्तिरेखा आहे,त्या स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पुरुष आलेला लोकांना आवडणार नाही. त्यामुळे तेव्हा ते पाऊल उचललं नाही गेलं.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Shiv Thakare : 'लोकशाही बळकट करण्यासाठी...', शिव ठाकरेने अमरावतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
