अक्षय खन्ना नव्हे तर 'हा' हिरो होता पहिली पसंत, औरंगजेब साकारण्यासाठी दिग्गजाला झाली होती विचारणा, पण...
छावा चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. पण या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्ना ही पहिली पसंद नव्हती.

Chhaava Film : सध्या बॉक्स ऑफिसवर छावा या चित्रपटाची धूम चालू आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट असल्यामुळे महाराष्ट्रातही हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहिला जातोय. दरम्यान, या चित्रपटाच्या मेकिंगच्या अनेक कथा सध्या समोर येत आहेत. याच चित्रपाटतील औरंगजेब पात्राविषयी नवी कथा समोर आली आहे.
अक्षय खन्नाच्या अभिनयाचे होतेय कौतुक
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. संभाजी महाराज यांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने केली आहे. तर महाराणी येसुबाई यांचे पात्र रश्मिका मंदानाने साकारलेली आहे. औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना या कसलेल्या अभिनेत्याने केलेली आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही आपापल्या पात्राला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. अक्षय खान्नाने केलेल्या अभिनयाची विशेष रुपाने चर्चा होत आहे.
अक्षय खन्ना ही पहिली पसंत नव्हती
अक्षय खन्नाने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याने आपले काम चोखपणे केल्याचं म्हटलं जातंय. पण औरंगजेब या पात्रासाठी अक्षय खन्ना ही पहिली पसंत नव्हती. हे पात्र साकारण्यासाठी दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांचा विचार केला जात होता. तशी विचारणादेखील अनिल कपूरकडे करण्यात आली होती. विशेष म्हणजे अनिल कपूरने हे पात्र साकारण्याची तयारीदेखील दाखवली होती. पण सर्व गोष्टी जुळून आल्या नाहीत. त्यामुळे अनिल कपूर या चित्रपटात येऊ शकले नाहीत.
बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची घोटदौड चालूच
त्यानंतर अक्षय खन्नाला औरंगजेबाची भूमिका देण्यात आली. आता प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतोय. या चित्रपटाने आज म्हणजेच 18 फेब्रुवारीपर्यंत 140.50 कोटी रुपये कमवले आहेत. अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट सिनेमागृहांत चालू आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची घोडदौड चालूच राहणार आहे.
हेही वाचा :
Mouni Roy Photos : लाल रंगाची बिकीनी, डोळ्यांवर काळा चष्मा, बिचवर खुललं मौनी रॉयचं सौंदर्य!























