Akshaye Khanna : 'छावा'त ज्यानं 'औरंगजेब' साकारला त्याचं जगणं वाचून आश्चर्यचकित व्हाल; अक्षय खन्ना राहतो असं की सर्वांना वाटावा हेवा!
अक्षय खन्नाची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे. पडद्यावर त्याने खलनायक साकारला असला तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तो आदर्शवादी जगणं जगतोय.

Akshaye Khanna : छावा चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा चालू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. छावाने आतापर्यंत 240 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलाय. या चित्रपटात बादशाहा औरंगजेबाची (Aurangzeb) भूमिका अक्षय खन्नाने साकारलेली आहे. त्याच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे. छावा चित्रपटामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. असे असतानाच आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा होत आहे.
अक्षय खन्नाने केलं कमबॅक
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारलेला आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. तर महाराणी येसुबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने केली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. त्याने पूर्ण ताकदीने या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. मात्र या चित्रपटामुळे त्याने एका प्रकारे कमबॅक केल्याचं म्हटलं जातंय.
वैयक्तिक आयुष्यात कसं जगतोय?
अक्षय खन्ना प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे देसभरात लाखोंनी चाहते आहेत. त्याच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्याने छावा चित्रपटात खलनायकाची भूमिका केली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तो प्रत्येकाला हेवा वाटावा असं जगतो. प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं तो राहतो. आजकाल मनोरंजन क्षेत्रात काम करणारे लोक, अभिनेते, अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रत्येक वेळी ते फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतात. मात्र अक्षय खन्ना या सोशल मीडियापासून फार दूर आहे. तो इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा एक्स यासारख्या कोणत्याही प्रसिद्ध समाजमाध्यमांवर नाही.
सोशल मीडियापासून आहे दूर
आजघडीला बॉलिवुडमधील काही कलाकारांचे सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. याच सोशल मीडियच्या मादतीने हे कलाकार लाखो- कोट्यवधी रुपये कमवतात. अक्षय खन्ना मात्र यापासून खूप दूर आहे. तो एखाद्या चित्रपटात अभिनय करतो आणि सोशल मीडियापासून दूर राहून त्याला हवं असणारं आयुष्य जगतो. त्याच्या याच विचारांचं आता सगळीगडे कौतुक होत आहे.
हेही वाचा :
आता अक्षय खन्नानंतर 'हा' मुरलेला अभिनेता करणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!






















