Deepika Padukone's Selfie: दीपिकाची कुटुंबासोबत भूतान ट्रिप; चाहत्यांसोबत काढले फोटो
दीपिकाचे (Deepika Padukone) भूतानमधील (Bhutan) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Deepika Padukone's Selfie: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही काही दिवसांपूर्वी भूतान (Bhutan) येथे ट्रीपला गेली होती.तिने भूतानमधील अनेक ठिकाणांना भेट दिली. दीपिका भूतान येथे तिच्या कुटुंबासोबत ट्रीपला गेली होती, असं म्हटलं जात आहे. दीपिकानं भूतानमधील तिच्या चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. दीपिकाचे भूतानमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
mrajasegaran नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि तिची एक फॅन दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आले,'मी तिच्या प्रायव्हसीचा आदर केला.जेव्हा ती एका फोटोसाठी तयार होती तेव्हा ती माझ्याकडे गेले आणि फोटो काढला. ती स्क्रीनवर जेवढी छान आहे तेवढीच ऑफ स्क्रीन देखील छान आहे.' दीपिका आणि तिच्या फॅनचा हा फोटो टायगर्स नेस्ट- किंगडम ऑफ भूतान येथील आहे. या फोटोमध्ये दीपिका ही नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
तसेच दीपिकानं युअर कॅफे रेस्टॉरंटला देखील भेट दिली. या रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्राम पेजवर दीपिकाचे काही फोटो शेअर करण्यात आले. या फोटोमध्ये दीपिका ही रेस्टॉरंटच्या स्टाफसोबत दिसत आहे. 'तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सर्व्ह करण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आम्हाला आनंद वाटतो', असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.
View this post on Instagram
दीपिकाचे आगामी चित्रपट
दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. या चित्रपटामधील दीपिकाच्या ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले. पठाण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तिचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. 'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Fighter: 'फायटर'मध्ये हृतिक साकारणार 'ही' भूमिका; दीपिकाच्या भूमिकेबाबत सिद्धार्थ आनंद म्हणाला...