एक्स्प्लोर

Telly Masala : अभिनेत्याचा लैंगिक छळ केल्याप्ररणी प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल ते सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

मोठी बातमी: सलमान खान आणि झिशान सिद्दीकींना पुन्हा धमकी, जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी

Salman Khan & Zeeshan Siddique Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आमदार झिशान सिद्धीकी यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

सूरज चव्हाण 'या' दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार, 'गुलिगत किंग'च्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला; अजित पवारांचा भरसभेत शब्द

Ajit Pawar Suraj Chavan New House : सध्या राज्यात विधानसभा लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी सोमवारी 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी भव्य रॅली काढत जोरदार भाषण केलं. यावेळी बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणही उपस्थित होता. सूरज चव्हाण मोढवे गावचा सुपुत्र असल्याने तो अजित पवारांच्या प्रचारात सामील झाला होता. अजित पवारांनी जनतेनं झापुक-झुपुक मतदान करा, असं म्हणत सूरज चव्हाणने जनतेला आवाहन केलं. दरम्यान, भाषणावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घरासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

लग्नानंतर नवं जोडपं निघालं देवदर्शनाला, पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताचा दौरा सुरु

Prithvik Pratap and Prajakta Waikul Temple Visit : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. पृथ्वीकने गुपचूप लग्न उरकलं. कोणताही गाजावाजा न करता पृथ्वीकने गर्लफ्रेंड प्राजक्त वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. 25 ऑक्टोबर रोजी पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळचा अत्यंत साध्या पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. आता नवजोडपं देवदर्शनाला निघालं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : पत्नी शुटींगमध्ये व्यस्त असल्याने फराळ बनवण्यासाठी अभिनेत्याचा पुढाकार, सुबक करंज्या बनवत शेअर केला व्हिडीओ

Actor Avinash Narkar Diwali Faral Video 2024 : दिवाळीची चाहूल लागली आहे. सर्वत्र सणासुदीचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र झगमगाट, सजावट, दिव्यांची आरास, फटाके आणि फराळ असं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळ सणाची लगबग पाहायला मिळत आहे. रोषणाई आणि फराळ यामध्ये कलाकारही व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना काही कलाकार कामात व्यस्त असल्याचंही दिसत आहे. अशाच कामात व्यस्त असलेल्या पत्नीची मदत करण्यासाठी अभिनेत्याने फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

"मला हॉटेलमध्ये बोलावून...", अभिनेत्याचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार; प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल

Director Ranjith Booked Sexually Assaulting Man : प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्याने लैंगिक छळाची तक्रार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात एका अभिनेत्याने लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका 31 वर्षीय अभिनेत्याने दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन याने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्याने तक्रारीत म्हटलं आहे की, दिग्दर्शकाने हॉटेलमध्ये बोलून त्याच्यावर लैंगिक छळ केला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

'अभिनेत्री काजोलचं विमान कोसळलं', आईला फोनवर मिळाली मुलीच्या निधनाची बातमी

Actress Kajol Death News : प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूच्या बातम्या जगभरात व्हायरल होताना पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी व्हायरल होणं तर आता एक सामान्य बाब झाली आहे. सोशल मीडियावर सध्या कोणत्याही बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बातमी खरी असो किंवा खोटी इंटरनेटमुळे ती सहज व्हायरल होते. अनेक वेळा बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही मृत्यूच्य अफवा उडतात. अखेर सेलिब्रिटींना स्वत: ऑनलाईन येत आपण जिवंत असल्याची ग्वाही द्यावी लागते. अशीच काहीशी घटना अभिनेत्री काजोलसोबत घडली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
Pune Crime: दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
Thackeray vs shinde: राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Candidate : महाविकास आघाडीचे 288 जागांवर 296 उमेदवारRamdas Sumthankar Contest Indipendent : भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्जMahavikas Aghadi And Mahayuti : महायुती आणि मविआत मैत्रीपूर्ण लढती होणारचEknath Khadse On Maharashtra Sarkar : वाढत्या महागाईवरुन खडसेंचा राज्यसरकारवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
Pune Crime: दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
Thackeray vs shinde: राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
Salman Khan : भाईजानचं टेन्शन मिटेना! पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी
मोठी बातमी : भाईजानचं टेन्शन मिटेना! पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी
Sunil Kedar: 'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल'; सुनील केदारांचा विरोधकांना इशारा
'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल'; सुनील केदारांचा विरोधकांना इशारा
Ind vs NZ: जसप्रीत बुमराहच्या जागी गौतम गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
बुमराहच्या जागी गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
Sunil Shelke: भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, सुनील शेळकेंचा थेट इशारा
Sunil Shelke: भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, सुनील शेळकेंचा थेट इशारा
Embed widget