(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : पत्नी शुटींगमध्ये व्यस्त असल्याने फराळ बनवण्यासाठी अभिनेत्याचा पुढाकार, सुबक करंज्या बनवत शेअर केला व्हिडीओ
Avinash Narkar Faral Video : पत्नी ऐश्वर्या नारकर शुटींगमध्ये व्यस्त असल्याने फराळ बनवण्यासाठी अविनाश नारकर यांनी पुढाकार घेतला आणि फराळ बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Actor Avinash Narkar Diwali Faral Video 2024 : दिवाळीची चाहूल लागली आहे. सर्वत्र सणासुदीचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र झगमगाट, सजावट, दिव्यांची आरास, फटाके आणि फराळ असं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळ सणाची लगबग पाहायला मिळत आहे. रोषणाई आणि फराळ यामध्ये कलाकारही व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना काही कलाकार कामात व्यस्त असल्याचंही दिसत आहे. अशाच कामात व्यस्त असलेल्या पत्नीची मदत करण्यासाठी अभिनेत्याने फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.
पत्नी शुटींगमध्ये व्यस्त, फराळ बनवण्यासाठी अभिनेत्याचा पुढाकार
सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनीही फराळ बनवायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या शुटिंगलमध्ये व्यस्त आहेत. मालिकेच्या शुटिंगमुळे त्यांना कुटुंबासोबत दिवाळीची तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाहीय. यामुळे त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांनी यंदा दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऐश्वर्या नारकर कामात व्यग्र असल्याने अविनाश नारकर यांनी फराळ बनवायला सुरुवात केली. त्यांनी सुबक करंज्या बनवल्या आणि त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुबक करंज्या बनवत शेअर केला व्हिडीओ
अविनाश नारकर यांनी करंज्या बनवतानाचा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते करंज्यांचं सारण बनवून हाताने करंज्यांना सुंदर आकार देताना दिसत आहेत. त्यानंतर ते करंज्या तळतानाही दिसत आहेत. सुबक करंज्या बनवतानाचा व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अविनाश नारकर यांनी बनवल्या करंज्या
अविनाश नारकर यांनी करंज्या बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'चला चला, या या या... सगळ्यांनी फराळाला या... मी,ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय, तेजोमय दिवाळी आणि नवीन वर्षांच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा!'
ऐश्वर्या नारकर यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
दरम्यान, या व्हिडीओवर ऐश्वर्या नारकर यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओलक "कमाल करंज्या..." अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय, 'तुमच्या सारखा गोड साथीदार मिळाला, तर करंज्या काय संसार पण गोडच होणार, अविनाश आणि ऐश्वर्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!' आणखी एकाने लिहिलंय, 'वाह... सर आम्ही करंज्या खायला नक्कीच येतो, शुभ दिपावली'.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी: सलमान खान आणि झिशान सिद्दीकींना पुन्हा धमकी, जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी