सूरज चव्हाण 'या' दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार, 'गुलिगत किंग'च्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला; अजित पवारांचा भरसभेत शब्द
Suraj Chavan New House Gruh Pravesh : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण याच्या नवीन घरातील गृहप्रवेशाचा मुहर्त ठरला आहे. त्याच्यासाठी अजित पवार यांनी भरसभेत शब्द दिला आहे.
Ajit Pawar Suraj Chavan New House : सध्या राज्यात विधानसभा लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी सोमवारी 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी भव्य रॅली काढत जोरदार भाषण केलं. यावेळी बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणही उपस्थित होता. सूरज चव्हाण मोढवे गावचा सुपुत्र असल्याने तो अजित पवारांच्या प्रचारात सामील झाला होता. अजित पवारांनी जनतेनं झापुक-झुपुक मतदान करा, असं म्हणत सूरज चव्हाणने जनतेला आवाहन केलं. दरम्यान, भाषणावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घरासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
'गुलिगत किंग'च्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला
अजित पवार यांनी बारामती विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेला संबोधित केलं. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाणबद्दलही भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, सूरजवरुन आईचं छत्र गेलं, वडिलांचं छत्र गेलं, पाच बहिणी आहेत. आपल्या मोढवेसारख्या गावात राहून त्याने शिकायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तो शाळेत गेला नाही. पण तो बिग बॉसमध्ये गेला आणि त्याने सगळ्यांवर बॉसगिरी दाखवली आणि बिग बॉसचा विजेता झाला. सूरजने बिग बॉस शो जिंकल्यामुळे तमाम महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना त्याचा अभिमान आहे.
'या' दिवशी सूरज चव्हाण हक्काच्या घरात प्रवेश करणार
अजित पवार पुढे म्हणाले की, आता आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी एक चांगलं घर बांधायचं ठरवलंय. सूरजच्या घराचा प्लॅन तयार आहे, त्याला नव्या घराचा प्लॅन आवडला आहे. वर्षभरात सूरजचं घर पूर्ण होईल. पाहा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, पुढच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूरज तू नव्या घरात प्रवेश करायचा आहे, हा आपला वादा आहे आणि दादांचा शब्द किती खरा असतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, असं वक्तव्य अजित पवार यांनी भरसभेत केलं आहे.
अजित पवारांचा भरसभेत शब्द
अजित पवार म्हणाले, "सुरज, तु पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवीन घरात प्रवेश करशील, हा माझा वादा आहे... अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी माझा शब्द मोडत नसतो..!"
सुरज, तु पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवीन घरात प्रवेश करशील, हा माझा वादा आहे... अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी माझा शब्द मोडत नसतो..!#BaramatiCheDada pic.twitter.com/2nDPXC4dP5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 28, 2024
अजित पवारांसाठी सूरज चव्हाणचं भाषण
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :