लहान मूल असो किंवा प्रौढ व्यक्ती प्रत्येकासाठी निरोगी आहार गरजेचा आहे.
पुढील पदार्थ चुकूनही टिफिनमध्ये पॅक करू नका अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
बर्गर, पिझ्झा, नूडल्ससारखे फास्ट फूड टिफिनमध्ये पॅक करत असाल तर लवकर आजारी पडू शकतात. फास्ट फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, सोडियम आणि साखर जास्त प्रमाणात असते.
चिप्स, कुकीज किंवा इतर प्रक्रिया केलेले पदार्थांत पोषक घटक नसतात. या पदार्थांमध्ये सोडियम आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
तळलेले पदार्थ आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. टिफिनमध्ये तळलेले पदार्थ अनेकदा पॅक करत असाल तर त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
आर्टिफिशियल फूड कलर अन्नाला रंग देण्याचे काम करतात, परंतु ते आरोग्यास कोणताही फायदा देत नाहीत, उलट ते फक्त नुकसान करतात.
फळांचा रस आणि ड्रिंक्सने तुमचे आरोग्य बिघडू शकते. ते जास्त प्यायल्याने वजन वाढणे, दात किडणे आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.