Rodies 18 : 'रोडीज 18'चा महाअंतिम सोहळा पार; इतिहासात पहिल्यांदाच दोन स्पर्धक ठरले विजेते
Rodies 18 : 'रोडीज 18' या लोकप्रिय अॅडव्हेंचर कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे.
Rodies 18 : 'रोडीज 18' (Rodies 18) या लोकप्रिय अॅडव्हेंचर कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. आशीश भाटिया (Aashish Bhatia) आणि नंदिनी (Nandini) 'रोडीज 18' चे विजेते ठरले आहे. सोनू सूदने हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट केला आहे.
'रोडीज 18' या कार्यक्रमात आशीष आणि नंदिनीमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. 'रोडीज'च्या इतिहासात पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे दोन विजेते ठरले. 'रोडीज 18' या अॅडव्हेंचर कार्यक्रमाचे शूटिंग साऊथ आफ्रिकामध्ये होत आहे. नंदिनी आणि आशीषला जिंकल्यानंतर 10 लाख आणि ट्रॉफीसह खास भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.
नंदिनी आहे फिटनेस ट्रेनर
नंदिनी एक उत्तम फिटनेस ट्रेनर आहे. तसेच 'रोडीज 18' हा कार्यक्रम जिंकण्यासाठी तिला तिच्या फिटनेसची खूपच मदत झाली आहे. रोडीजमध्ये तिने सलग सात तास बाइक राइड केली आहे. नंदिनी रोडीज हा कार्यक्रम पाहत लहानाची मोठी झाली आहे. पण या कार्यक्रमात ती कधी सहभागी होईल असे तिला कधीच वाटले नाही.
Splitsvilla चा भाग असू शकतो आशीष आटिया
आशीष आटिया रोडीजआधी Splitsvilla चा भाग होता. 'रोडीज 18' या कार्यक्रमात 20 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे 17 सीझन रणविजय सिंघाने होस्ट केले होते. पण आता 'रोडिज 18' मात्र सोनू सूदने होस्ट केले आहे. सोनू सूद हा कार्यक्रम होस्ट करत असल्याने त्याचेदेखील प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. आता प्रेक्षकांना नव्या पर्वाची उत्सुकता आहे. नवे पर्वदेखील सोनू सूद होस्ट करणार असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या
Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो
Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण
Rodies: एमटीव्हीचा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो 'रोडीज' सोनू सूद करणार होस्ट!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
