Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो
Rodies : एमटीव्हीचा 'रोडीज' हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी शो तरुणाईला खूप आवडतो. या कार्यक्रमातील स्पर्धक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतात.
Sonu Sood To Host Rodies : 18 वर्षे रोडीज (Rodies) होस्ट केल्यानंतर रणविजय सिंहने (Ranvijay Singha) आता हा लोकप्रिय कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आता हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करणार आहे. सोनू सूददेखील 'रोडीज'चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे.
रणविजय सिंह अनेक वर्षांपासून 'रोडीज' आणि एमटीव्हीचा भाग होते. फक्त रोडीजच नव्हे तर 'स्प्लिट्सविला' सारखा कार्यक्रमदेखील रणविजयने होस्ट केला आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी 'शार्क टँक इंडिया' हा कार्यक्रमदेखील रणविजयने होस्ट केला होता. लवकरच या कार्यक्रमाच्या दुसरा भाग रणविजय सिंह होस्ट करणार आहे.
View this post on Instagram
सोनू सूदने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद मोगा येथील एका दुकानात समोसे खाताना दिसत आहे. समोसे खाण्यामागचे मजेदार कारणदेखील सोनूने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सोनू म्हणाला,"सध्या मी मोगा येथे समोसा खातो आहे. लवकरच मी 'रोडीज' हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. या कार्यक्रमात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. रोडीजचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे मी समोसे खात आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत समोसे मिळत नाही".
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो
Aggabai Sasubai : मराठीतील 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेचा होणार 'कन्नड' भाषेत रिमेक
Lata Mangeshkar Last Song : लता मंगेशकर यांचे शेवटचे गाणे ऐकून चाहते भावूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)