Ramayana Movie update : रणबीर कपूरचा रामायण वादाच्या भोवऱ्यात, कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?
Ramayana Movie update : रणबीर कपूरचा आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत असलेल्या रामायण सिनेमाच्या शुटींगला सध्या सुरुवात झाली आहे. पण हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
Ramayana Movie update : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण (Ramayana) सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचं शुटींग सुरु होण्याआधीपासूनच हा सिनेमा बराच चर्चेत आलाय. सिनेमाच्या सेटवरील फोटोही मागच्या काळात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. रामायण सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तसेच सई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सिनेमा तीन भागांमध्ये तयार केला जाणार आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रोडक्शन हाऊस अल्लू मंटेना मीडिया वेंचर एलएलपी यांचा दावा आहे की, रणबीर कपूरच्या रामायण या सिनेमाचं स्क्रिप्ट त्यांच्या प्रोजक्ट रामायण या सिनेमावर आधारित आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचे कॉपी राईट्सही आमच्याकडे असल्याचं या प्रोडक्शन हाऊसचं म्हणणं आहे. त्यामुळे सिनेमाच्या सध्याच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच प्राईम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसने जर या कंटेंटचा वापर केला तर ते कॉपीराईटचं उल्लंघन मानलं जाईल. अल्लू मंटेना मीडिया वेंचरने आपले कॉपीराईट सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर कारवाईची देखील धमकी दिली आहे. पण सध्या तरी नितेश तिवारी आणि सह-निर्माता यशने या रिपोर्ट्सवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
रामायणावर होऊ शकते कायदेशीर कारवाई
असं म्हटलं जातंय की, प्राइम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेडसोबत या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पैश्यांच्या व्यवहारासंदर्भात देखील चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू मंटेना मीडिया वेंचर एलएलपीचा दावा आहे की, या सिनेमाचे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत आणि यावर कोणत्याही दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसचा अधिकार असणार नाही.
सिनेमाच्या चित्रीकरणावर होणार परिणाम
त्याचप्रमाणे असं देखील म्हटलं जात आहे की, यामुळे या सिनेमाच्या चित्रीकरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. पण आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, या सिनेमाचे निर्माते यावर काय पावलं उचलणार.