(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saiee Manjrekar: 'या' कारणामुळे महेश मांजरेकरांच्या लेकीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक; व्हायरल व्हिडीओला कमेंट करत म्हणाले...
नुकताच सईचा (Saiee Manjrekar) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी सईचं कौतुक केलं आहे.
Saiee Manjrekar: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सईचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच सईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सई एका मोबाईल कव्हर विकणाऱ्या मुलाकडून कव्हर घेताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मोबाईल कव्हर विकणारा मुलगा सईच्या गाडी जवळ येऊन उभा राहतो. त्यानंतर सई त्याच्याकडे जाऊन एक मोबाईल कव्हर घेते. सई तिचा मोबाईल त्या कव्हरमध्ये घालते. त्यानंतर सई त्या मुलाला काही पैसे देते. सईच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी सईचं कौतुक केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
'ती मनाने चांगली आहे, ते या व्हिडीओमधून कळत आहे. तिने त्या मुलाला जास्त पैसे दिले. पण कॅमेऱ्यापासून लपवून ते पैसे तिनं दिले, यावरुनच कळतं की तिनं दिखावा न करता खरी मदत केली आहे.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं सईच्या व्हायरल व्हिडीओला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ती खऱ्या अर्थाने चांगली व्यक्ती आहे.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सईचे चित्रपट
सईला दबंग-3 या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात सईसोबत सलमान खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच सईनं 2022 मध्ये रिलीज झालेल्या मेजर या चित्रपटामध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. औरों में कहा दम था, कुछ खट्टा हो जाय या चित्रपटांमधून सई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. मांझा, दुनिया या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील सईनं काम केलं आहे. सईच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सईचे वडील महेश मांजरेकर यांचा "वेडात मराठे वीर दौडले सात" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Saiee Manjrekar: महेश मांजरेकरांच्या लेकीचे फोटो व्हायरल.... सई दिसतेय एकदम बोल्ड