India Most Expensive Web Series : देशातील सर्वात महागडी वेबसीरिज कोणती? बजेटसमोर 'हीरामंडी' कुठेच नाही
Indian Expensive Web Series : लोकांची आवड लक्षात घेत निर्माते वेबसीरिजवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. जाणून घ्या देशातील सर्वात महागड्या वेबसीरिजबद्दल...
Indian Expensive Web Series : कोरोनानंतर घरबसल्या वेब सीरिज (Web Series) पाहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. काळानुसार प्रेक्षकांचं मनोरंजनाचं माध्यम बदललं आहे. आता एखादा चांगला चित्रपट (Movie) पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरची प्रतीक्षा करावी लागत नाही. तर घरबसल्या ओटीटीवर प्रेक्षकांना त्यांना हवा त्या जॉनरचा कंटेट पाहता येत आहे. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. हे चित्रपट आणि वेबसीरिज ओटीटीच्या जोरावर कोट्यवधींची कमाई करतात. त्यामुळे या वेबसीरिजसाठी निर्मातेदेखील कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. पण भारत देशातील सर्वात महागडी वेबसीरिज कोणती? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? जाणून घ्या देशातील सर्वात महागड्या वेबसीरिजबद्दल..
देशातील सर्वात महागडी वेबसीरिज कोणती? (India Most Expensive Web Series)
नेटफ्लिक्सने 2018 मध्ये भारतात आपला प्रचार करायला सुरुवात केली. त्यावेळी नेटफ्लिक्सने आपला ओरिजनल कंटेट आणि मोठे प्रोजेक्ट एसएस राजामौलीच्या ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपटाच्या सीरिजची स्पिनऑफ/ प्रीक्वलची घोषणा केली. या सीरिजचं नाव होतं 'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' (Baahubali Before the Beginning). आनंद नीलकंठन यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित ही सीरिज आहे. या चित्रपटात राम्या कृष्णनने शिवगामीचं पात्र साकारलं होतं.
'बाहुबली'साठी निर्मात्यांचं बजेट किती होतं?
'बाहुबली: बिफोर द बिगनिंग' या सीरिजमध्ये आधी मृणाल ठाकुरला तरुण शिवगामीच्या भूमिकेत घेण्यात आलं होतं. सीरिजवर 2018 मध्ये काम सुरू झाल्यानंतर राहुल बोस आणि अतुल कुलकर्णीदेखील ऑनबोर्ड आले. त्यावेळी सीरिजवर 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पण नेटफ्लिक्सने 2021 मध्ये या सीरिजवर नव्याने काम करण्याचा निर्णय घेतला. मृणाल ठाकूरऐवजी त्यांनी वामिका गब्बीची निवड केली. या सीरिजवर एकूण 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
'या' चित्रपटांपेक्षा जास्त सीरिजचं बजेट
'बाहुबली बिफोर द बिगनिंग' या चित्रपटाची निर्मिती 300 कोटी रुपयांत करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या पोलिस फोर्स आणि हीरामंडीचं बजेट 200 कोटी रुपये होतं. 'बाहुबली बिफोर द बिगनिंग' ही सीरिज भारतातील अनेक महागड्या चित्रपटांपेक्षा महागडी आहे. 'अॅनिमल'चं बजेट 100 कोटी रुपये होतं. 'डंकी'चं बजेट 180 कोटी रुपये होतं. आणि 'फायटर' व 'पठाण'चं बजेट 250 कोटी रुपये होतं. आता आगामी चित्रपटांची आणि वेबसीरिजची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
संंबंधित बातम्या