Amruta Fadnavis : 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांना पुरस्कार, ट्वीट करत दिली माहिती
Amruta Fadnavis : कान्स चित्रपट महोत्सवात अन्न आरोग्य आणि शाश्वत विकास यासंबंधी जनजागृती केल्यामुळे अमृता फडणवीस यांना पुरस्कार मिळाला आहे.
Amruta Fadnavis : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी 75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला' हजेरी लावली होती. दरम्यान या महोत्सवात अमृता फडणवीसांना पुरस्कारदेखील मिळाला आहे.
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'त अमृता फडणवीसांनी 'अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास' यासंबंधी जनजागृती केली होती. तसेच महोत्सवातील मास्टरमाइंड फोरममध्ये त्यांनी जनजागृती करणारे भाषणदेखील केले. महोत्सवात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे तसेच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 'कान्स चित्रपट महोत्सवा'त पुरस्कार देण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुरस्कारासंदर्भात माहिती दिली आहे. अमृता फडणवीस यांचा कान्स लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांची बरीच गाणी रिलीज झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
And finally-received award at #CannesFilmFestival2022 for bringing about meaningful & significant changes, positively impacting the world, organised by Better World Fund.
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 28, 2022
The other awardees were-First Lady of Cote d’Ivoire H.E. Dominique Quattara, Sharon Stone & Skyler Griswold🙏 pic.twitter.com/9nxnTXK7nB
भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान
कान्स चित्रपट महोत्सवात भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे.
'कान्स चित्रपट महोत्सवात' सहभागी झाले 'हे' कलाकार
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवात' दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवत आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवला आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स चित्रपट महोत्सवात' सहभागी होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या