Taylor Swift : 'ही' आहे जगातली सर्वात श्रीमंत कलाकार, एका दिवसात कमावते 100 कोटी
American Artist Taylor Swift : अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टने एका दिवसात 100 कोटींची कमाई केली आहे.
American Artist Taylor Swift Income : अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट (Taylor Swift) सध्या चर्चेत आहे. या गायिकेने एका दिवसात तब्बल 100 कोटींची कमाई केली आहे. टेलर स्विफ्ट ही लोकप्रिय गायिका आणि लेखक आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टेलर स्विफ्टचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती सर्वाधिक कमाई करते.
टेलर स्विफ्ट दिवसाला करते 100 कोटींची कमाई
टेलर स्विफ्ट सध्या 'द एराज टूर' नावाचा एक कार्यक्रम करत आहे. जगभरात टेलरच्या या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. दिवसाला 13 मिलियन डॉलरच्या तिकीटांची विक्री होत आहे. भारतीय रुपयांनुसार टेलर स्विफ्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवसाला 100 कोटींची कमाई करते.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, टेलर स्विफ्ट ही जगातील सर्वात श्रीमंत कलाकार आहे. तिच्या 'द एराज टूर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती दिवसाला 100 कोटींची कमाई करते. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून टेलरने 300 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. हा कार्यक्रम सुरू होऊन 22 दिवस पूर्ण झाले असून अजून 50 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
टेलर स्विफ्ट 'द एराज टूर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील 50 दिवसांत 1.3 बिलियन डॉलरची कमाई करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. टेलरच्या 'द एराज टूर' या कार्यक्रमाच्या एका तिकीटाची किंमत 254 डॉलर आहे. याआधीदेखील टेलरने 'द एराज टूर'सारखे अनेक कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीटांची किंमत 119 डॉलर होती.
टेलर स्विफ्टचा जगभरात डंका
टेलर स्विफ्ट ही फक्त 33 वर्षांची आहे. वयाच्या 33 व्या वर्षी सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत टेलरचा समावेश झाला आहे. टेलर दिवसाला 13 मिलियन डॉलर म्हणजेच 106 कोटींपेक्षा अधिक कमाई करते. तिचा एक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांना 21 हजार रुपये खर्च करावे लागतात. टेलर स्विफ्टच्या 'द एराज टूर'चे आतापर्यंत 11 लाखापेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. टेलरला लहानपणीच संगीताची गोडी लागली होती. वयाच्या 12 व्या वर्षी तिने गिटार वाजवायला सुरुवात केली. आज टेलरच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे. 2019 मध्ये आलेल्या 'लवर' या सिनेमातील गाणी टेलरने गायली आहेत.
संबंधित बातम्या