Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची दमदार ओपनिंग; तीन दिवसांत केली सात कोटींपेक्षा अधिक कमाई
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत सात कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Baipan Bhaari Deva Marathi Movie Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धमाका करत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने सात कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 3)
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.3 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 2.45 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.30 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 7.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.
बॉक्स ऑफिस गाजवतोय मराठी सिनेमा
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी अनेक महिला आपल्या कुटुंबियांसोबत जात आहेत. तर मैत्रिणींचा ग्रूप, महिला मंडळदेखील हा सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यामुळे सिनेमागृह महिला वर्गाने हाऊसफुल्ल केलं आहे. 'झिम्मा'नंतर 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा महिला आवडीने पाहत आहेत. महिला वर्गाची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम या सिनेमाने केलं आहे.
View this post on Instagram
'बाईपण भारी देवा' या सिनेमातील अभिनेत्री समाजातील विविध स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. त्यामुळे हा सिनेमा महिलावर्गाला भावला आहे. सहा बहिणींची रंजक गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर सिनेप्रेमींसह अनेक कलाकारांनीदेखील सिनेमाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'बाईपण भारी देवा'
नावाप्रमाणेच 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची स्टारकास्टदेखील दमदार आहे. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब मुख्य भूमिकेत आहेत. एका पेक्षा एक असणाऱ्या अभिनेत्रींना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. केदार शिंदेंनी (Kedar Shinde) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या