Alexx O’Nell: जन्म अमेरिकेचा पण गाजवतोय बॉलिवूड, कोण आहे अॅलेक्स ओनेल? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल...
अॅलेक्स ओनेलनं (Alexx O’Nell) अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जाणून घेऊयात अॅलेक्स ओनेलबद्दल...

Alexx O’Nell: सध्या काही बॉलिवूड अभिनेत्री हॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं बघायला मिळत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्री हॉलिवूडमध्ये काम करत आहेत. पण तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल माहित आहे का? ज्याचा जन्म अमेरिकेत झाला. पण तो सध्या बॉलिवूडमध्ये काम करत आहे. या अभिनेत्याचं नाव अॅलेक्स ओनेल आहे. अॅलेक्स ओनेलनं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जाणून घेऊयात अॅलेक्स ओनेलबद्दल...
कोण आहे अॅलेक्स ओनेल?
अॅलेक्स ओनेल हा अमेरिकन वंशाचा अभिनेता आहे, ज्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अॅलेक्स ओनेलचा जन्म अमेरिकेती कनेटिकट येथे झाला. अॅलेक्स ओनेलनं चिनी कम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील अनेक चित्रपट,मालिका आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे. गोलोंदाज, रुही, आर्या, मैं और चार्ल्स, चिनी कम, मद्रासपट्टिनम, जोक या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये अॅलेक्स ओनेलनं काम केलं. तसेच नच बलिये या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये देखील अॅलेक्स ओनेलनं सहभाग घेतला होता.
अॅलेक्स ओनेलनं सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा आनुभव
अॅलेक्स ओनेलनं चिनी कम या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. एका मुलाखतीमध्ये अॅलेक्स ओनेलनं बिग बींसोबत काम करण्याचा आनुभव सांगितला. तो म्हणाला, 'चिनी कम हा माझा पहिला मोठा बॉलिवूड चित्रपट होता आणि सेटवर मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत घालवलेला वेळ मला आठवतो. मी त्यांच्याकडून नम्रता आणि प्रोफेशनलिझम शिकलो.'
'या' बॉलिवूड कलाकारांसोबत केलं काम
जोकर या 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटामध्ये काम केलं आहे. तसेच अॅलेक्स ओनेलनं प्रतिक गांधी, सुष्मिता सेन आणि राजकुमार राव यांच्यासोबत काम केलं आहे.
View this post on Instagram
अॅलेक्स ओनेलबरोबरच कल्की कोचलिन, टॉम अल्टर, बार्बरा मोरी, नर्गिस फाखरी, रॅचेल शेली यांसारख्या अनेक परदेशी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. या सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
