एक्स्प्लोर

Christopher Nolan : दिग्दर्शकाच्या नावावरच Oppenheimer हाऊसफुल्ल; भन्नाट हॉलिवूडपट देणारा ख्रिस्तोफर नोलन कोण आहे?

Oppenheimer : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहाइमर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Christopher Nolan : हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) सध्या 'ओपनहाइमर' (Oppenheimer) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. पण ख्रिस्तोफर नोलनच्या नावावर हा सिनेमा हाऊसफुल्ल होत असल्याचे म्हटले जात आहे. ख्रिस्तोफर नोलन यांनी आजवर हॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

ख्रिस्तोफर नोलन कोण आहे? (Who Is Christopher Nolan)

ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या ख्रिस्तोफर नोलनला बालपणीच मनोरंजनसृष्टीची गोडी लागली होती. 1998 साली 'फॉलोइंग' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. पण त्याच्या 'मोमेन्टो' या सिनेमाच्या माध्यमातून त्याला लोकप्रियता मिळाली. आव्हानात्मक सिनेमांची मांडणी करण्यासाठी ख्रिस्तोफर ओळखला जातो. 

नोलनच्या सिनेमांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर, बाफ्टा अशा अनेक मानाच्या पुरस्कारांची नामांकनं मिळाली आहेत. तसेच जगातील 100 प्रभावी व्यक्तीमत्त्वांच्या यादीत ख्रिस्तोफर नोलनचा समावेश आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेला 'ओपनहाइमर' (Oppenheimer) हा ख्रिस्तोफर नोलनचा 12 वा सिनेमा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Christopher Nolan (@christophernolann)

बॉक्स ऑफिसचा राजा 'ख्रिस्तोफर नोलन'!

टेनेट (Tenet), द डार्क नाइट राइजेस (The Dark knight Rises), इंटरस्टेलर (Interstellar), इन्सेप्शन (Inception), बॅटमॅन बिगिन्स (Batman Begins), इन्सोमॅनिया (Insomnia), द डार्क नाइट (The Dark Night), डंकर्क (Dunkirk), मोमेंटो (Memento), द प्रेस्टिज (The Prestige) हे ख्रिस्तोफर नोलनचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यामुळे ख्रिस्तोफर नोलन हा जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा राजा आहे.

ख्रिस्तोफर नोलनने (Christopher Nolan) सामाजिक, विज्ञान अशा वेगवेगळ्या गोष्टींवर सिनेमे बनवले आहेत. त्याच्या प्रत्येक हॉलिवूडपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. त्याचे सिनेमे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. ख्रिस्तोफर एक दिग्दर्शक असण्यासोबत निर्मातादेखील आहे. सिनकॉपी इनकॉर्पेरेट हे त्याच्या निर्मितीसंस्थेचं नाव आहे. हॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांना घेऊन ख्रिस्तोफरने सिनेमांची निर्मिती केली आहे. आता ख्रिस्तोफर नोलनच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Oppenheimer : अणुबाँबचा जनक 'ओपनहायमर' बघाच... पण त्या आधी ख्रिस्तोफर नोलनचे हे दहा भन्नाट हॉलिवूडपट पाहिलेत का?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget