Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर बीडमध्ये घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील दाखल करण्यात आला आहे. यामुळे बीडमधील (Beed News) वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे आज सकाळपासून परळी पोलीस स्टेशनबाहेर वाल्मिक कराडच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली
तर आज सकाळपासून वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्याचे दिसून आले. लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र, कराडच्या मातोश्री पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली अजे. त्या रस्त्यात चक्कर येईन पडल्याचे समजते. जमलेल्या समर्थकांनी त्यांना पाणी दिलं, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाला न्याय मिळावा, म्हणून त्या सतत्याने मागणी करत असल्याचे दिसून येते.
परळी बंदची हाक
दरम्यान, बीडमध्ये वाल्मिक कराडला न्याय मिळावा म्हणून समर्थक आक्रमक झाले आहेत. कराड यांच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. तर एका महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. तसेच वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. यामुळे बीडमधील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...