Aishwarya Rai : ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया; 'कान्स'मध्ये जलवा दाखवल्यानंतर भारतात परतली विश्वसुंदरी
Aishwarya Rai Surgery : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वसुंदरीवर या आठवड्यात शस्त्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात तिचा हात मोडला होता.
Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या 77 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (Cannes Film Festival 2024) सहभागी झाली होती. कान्समधील ऐश्वर्याचे दोन दिवसातील लूक समोर आले आहेत. ऐश्वर्याचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अभिनेत्रीचे कपडे आणि सौंदर्यापेक्षा चाहते मात्र तिच्या हाताला दुखापत झाल्याने हैरान झाले आहेत. ऐश्वर्या आता भारतात परतली आहे. एअरपोर्टवर अभिनेत्रीच्या हातावरचं प्लास्टर पाहून तिला पापराझींनी प्रश्न विचारते. आता मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याच्या जवळच्या सूत्रानुसार एक आठवड्याआधी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला फ्रॅक्टर असूनही ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला जाणं सोडलं नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री कान्समध्ये सहभागी झाली होती. अभिनेत्रीची कान्समध्ये जाण्याची परंपरा होती. त्यामुळे हात मोडलेला असतानाहीही तिने आपल्या व्यावसायिक कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्राने पुढे सांगितलं की, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) स्पेशलिस्ट आणि डॉक्टरांच्या सल्लानुसार फान्सला गेली होती. आता भारतात परतल्यानंतर लगेचच ती आपली शस्त्रक्रिया करणार आहे. अभिनेत्रीचा हात कसा मोडला, हाताला दुखापत नेमक्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीची शस्त्रक्रिया या आठवड्याच्या शेवटी पार पडणार आहे.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्याचा जलवा
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. ऐश्वर्या रायने कान्सच्या पहिल्या दिवशी काळ्या-पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी निळा, हिरवा आणि सिल्वर रंगाचा टिनसेल गाऊन परिधान केला होता. तिचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्याने लाडकी लेक आराध्या बच्चनसोबत हजेरी लावली होती.
ऐश्वर्या राय बच्चन शेवटची मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटात झळकली. या चित्रपटात ऐश्वर्यासह जयम रवी, शोभिता धूलिपाला आणि ऐश्वर्या लक्ष्मी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. ऐश्वर्या राय बच्चननंतर कियारा आडवाणी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली. कियाराने पिंक-ब्लँक गाऊन परिधान केला होता. तिच्या किलर अंदाजाचं चांगलच कौतुक होत आहे. ऐश्वर्याच्या आता आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा घटस्फोट होणार असल्याचीदेखील चर्चा आहे. पण दोघांनी अद्याप यासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही.
संंबंधित बातम्या