एक्स्प्लोर

सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला

सदाभाऊ खोत यांनी भाषणात बोलताना म्हटले होते की, शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, म्हणजे आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, अशा शब्दात टीका केली होती.

मुंबई : निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, दिग्गज नेत्यांवर टीका टीपण्णी करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बडे नेते टीका करताना दिसून येतात. त्यात, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपसोबत असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने टीका होत असते. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जत विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर बोचरी व शारिरीक व्यंगावरुन टीका केली. आता, त्यांनी केलेल्या या टीकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

सदाभाऊ खोत यांनी भाषणात बोलताना म्हटले होते की, शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, म्हणजे आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, अशा शब्दात टीका केली होती. त्यावर, जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. 

सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी...असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

हेही वाचा

पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget