मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक, मतदान केंद्रावर शुकशुकाट
मेळघाटमधील (Melghat) आदिवासींना सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आज मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर शुकशुकाट असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Maharashtra Vidhansabha Election 2024 Amravati : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhansabha Election) साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी नागरिकांचा कुठं चांगला तर कुठं अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, मेळघाटमधील (Melghat) आदिवासींना सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आज मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर शुकशुकाट असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार
अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या 6 गावामध्ये 1 हजार 300 मतदार आहे. या सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मूलभूत सुविधा, पाणी, रोड, नाल्या, वीज नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आधी सुविधा द्यावी आणि त्यानंतर मग मतदान करावं असा निर्धात गावकऱ्यांनी केला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर कुठे कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं याची माहिती समोर आली आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
अमरावती जिल्ह्यातील सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अचलपूर - 22.29 %
अमरावती - 17.33 %
बडनेरा - 16.20 %
दर्यापूर - 15.40 %
धामणगाव रेल्वे- 15.41 %
मेळघाट - 18.16 %
मोर्शी - 19.99 %
तिवसा - 15.47 %
या मतदारसंघात मतदानासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद
१ आरमोरी ३०.७५
२ अहेरी ३०.०६
३ उरण २९.२६
४ आमगाव २९.०६
५ अर्जुनी-मोरगाव २७.४
६ दिंडोरी २६.४१
७ सिल्लोड २६.२८
८ करवीर २६.१३
९ शहादा २४.९८
१० वणी २४.८८
११ चिमूर २४.६८
१२ नवापूर २४.५८
१३ चिपळूण २४.५७
१४ गुहागर २४.३६
१५ ब्रह्मपुरी २४.१५
मुंबईत किती झालं मतदान?
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सकाळी ७ ते ११ दरम्यान 15.78 टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.99 टक्के मतदान झाले. मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. सकाळी 11 वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात झाले. याठिकाणी 12.82 टक्के इतका मतदानाचा टक्का नोंदवण्यात आला. मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 23.42 टक्के मतदान झाले. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान झाले. याठिकाणी १३.९८ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली.