Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
Vidhansabha Nivadnuk nikal 2024: विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली, जाणून घ्या डिटेल आकडेवारी.
![Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ! Maharashtra Vidhan Sabha Election result 2024 vote percentage BJP Congress Shivsena NCP Sharad Pawar camp Uddhav Thackeray Camp Maharashtra Vidhansabha Nivadnuk nikal 2024 Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/3d8e61c3bf6049bba71c55d50d2f723c1732344677033215_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला 236 तर मविआला अवघ्या 49 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप पक्षाला ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. भाजपने एकट्याने 288 पैकी 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागांवर विजय मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आलेल्या अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारत विधानसभेला 41 जागा निवडून आणल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवार गटाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळाला.
या निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवर आणि पॅटर्नवर नजर टाकल्यास अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळतात. अजित पवार यांच्या पक्षाला राज्यात सर्वाधिक कमी मतं मिळाली आहेत. तरी अजित पवार गटाने 41 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची कमाल करुन दाखवली आहे. तर अजितदादा गटापेक्षा तब्बल 22 लाख मतं जास्त मिळवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 16 जागा मिळाल्या आहेत.
राज्यात मतदारांनी पक्षनिहाय दिलेल्या मतदानाची वैशिष्ट्ये
# भाजपला 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मते मिळाली आहेत.
# भाजपची मतं इतर पाच पक्षांनी individually घेतलेल्या मतदानापेक्षा दुपटीपेक्षाही जास्त आहेत.
# दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसला 80 लाख 20 हजार 921 मतं मिळाली आहे.
# तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट असून शिवसेनेला काँग्रेसपेक्षा थोडेच कमी म्हणजेच 79 लाख 96 हजार 930 मतं मिळाली आहेत.
# चौथ्या क्रमांकावर शरद पवार यांची राष्ट्रवादी असून 72 लाख 87 हजार 797 मतं मिळवली आहेत.
# पाचव्या क्रमांकावर ठाकरे यांची शिवसेना असून त्यांना 64 लाख 33 हजार 013 मतं मिळाली आहेत.
# अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या क्रमांकावर असून त्यांना 58 लाख 16 हजार 566 मते मिळाली आहेत.
# शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त मत मिळाली आहेत. कारण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत खूप जास्त जागा लढवल्या होत्या.
# अजित पवारांनी कमी मात्र निवडक व हमखास निवडून येणाऱ्या जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे शरद पवार गटापेक्षा 14 लाख 71 हजार 231 मतं कमी मिळवूनही त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले.
# शिंदेंच्या शिवसेनेने मात्र ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा फक्त जागांच्या बाबतीतच नाही, तर मतांच्याबाबतीतही मोठी आघाडी घेतली आहे. शिंदेंच्या सेनेने ठाकरेंच्या सेनेपेक्षा 15 लाख 63 हजार 917 जास्त मिळवली आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)