Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सख्ख्या भावांना तिकीट, तीन अपक्षांना उमेदवारी; नेत्यांची मुलंही मैदानात, भाजपच्या पहिल्या यादीची 5 वैशिष्ट्ये!
मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाला मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. भोकरमधून भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपकडून (BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भाजपकडून विशेषतः विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. ज्या आमदारांची तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे त्यांना दुसऱ्या यादीमध्ये ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा उमेदवारीची टांगती तलवार कायम आहे. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर बदलले जाणार नाहीत अशा ठिकाणी भाजपकडून पहिले यादीमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वादाच्या जागा आहेत त्याठिकाणी अजून उमेदवार जाहीर करणं भाजपने टाळलं आहे. त्यामुळे जे उमेदवार बदलले जातील ते दुसऱ्या यादीमध्ये असतील अशी चर्चा आहे.
तीन अपक्षांना उमेदवारी, नेत्यांची मुलंही मैदानात
दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सख्ख्या भावांना तिकीट देण्यात आलं आहे. तीन अपक्षांना उमेदवारी देण्यात आली असून नेत्यांची मुलंही मैदानात आहेत. घराणेशाहीवर सातत्याने बोललं जात असताना मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाला मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. भोकरमधून भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भामधून सर्वाधिक कुणबी उमेदवार देण्यात आले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. सर्वाधिक संवेदनशील झालेल्या मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मनोज जारंगे पाटील यांचा फॅक्टर कमी कसा करता येईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आलं आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये तीन अपक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये महेश बालदी यांचा सुद्धा समावेश आहे, तर अन्य दोन अपेक्षांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. यामध्ये राजेश बकाने यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे, तर विनोद अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते.
भाजपच्या पहिल्या यादीत 13 उमेदवारांना संधी
दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीत 99 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र यंदा त्यांना संधी देण्यात आली आहे. कणकवली येथून नितेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये 14 ठिकाणी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबईत कोणाला संधी मिळाली?
घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांचा पत्ता कट केला जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली आहे. मालाड पश्चिममधून विनोद शेलार (Vinod Shelar) यांना संधी देण्यात आली आहे. विनोद आशिष शेलार यांचे बंधू आहेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंड मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे, तर कुलाबामधून राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. मंगल प्रभात लोढा यांना मलबार हिल मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममधून अमित साटम यांना संधी देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र चिंचवडमधून मनीषा जगताप यांच्या ऐवजी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूडमधून पुन्हा एकदा चंद्रकांत दादा पाटील उमेदवारीच्या रिंगणात असणार आहेत. कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. सातारमधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये नुकताच पक्ष प्रवेश केलेल्या राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील दोन ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मिरजमधून सुरेश खाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सांगलीमधून सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या