एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha election : मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

BJP First candidate list : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Maharashtra Vidhansabha election ,BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024 : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. दरम्यान आज भाजप उमेदवार यादी जाहीर करत मैदानात उतरला आहे.

दानवेंच्या मुलाला तर चव्हाण यांच्या मुलीला संधी

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांना देखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे 
जळगाव शहर - सुरेश भोळे 
चाळीसगाव - मंगेश चव्हाण 

जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव - आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) - संजय कुटे 
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद 
अचलपूर - प्रवीण तायडे 
देवली - राजेश बकाने 
हिंगणघाट - समीर कुणावार 
वर्धा - पंकज भोयर 
हिंगना - समीर मेघे 
नागपूर दक्षिण - मोहन माते 

नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले 
गोंदिया - विनोद अग्रवाल 
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे 
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
चिमूर - बंटी भांगडिया 
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव - अशोक उडके 
यवतमाळ - मदन येरवर 
किनवट - भीमराव केरम 
भोकर - श्रीजया चव्हाण
नायगाव - राजेश पवार 
मुखेड - तुषार राठोड 

हिंगोली - तानाजी मुटकुले 
जिंतूर - मेघना बोर्डीकर 
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे 
भोकरदन -संतोष दानवे 
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे 
गंगापूर - प्रशांत बंब 
बगलान - दिलीप बोरसे 
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले 
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे 
नालासोपारा - राजन नाईक 
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले 
मुरबाड - किसन कथोरे 
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड 
डोंबिवली - रवींद्र चव्हाण 
ठाणे - संजय केळकर 
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे 
दहिसर - मनीषा चौधरी 
मुलुंड - मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर 
चारकोप - योगेश सागर 
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम 
विले पार्ले - पराग अलवणी 
घाटकोपर पश्चिम - राम कदम 
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
वडाळा - कालिदास कोळंबकर 
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
कुलाबा - राहुल नार्वेकर 
पनवेल - प्रशांत ठाकूर 
उरन - महेश बाल्दी 
दौंड- राहुल कुल 
चिंचवड - शंकर जगताप 
भोसली -महेश लांडगे 
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले 
कोथरुड - चंद्रकांत पाटील 
पर्वती - माधुरी मिसाळ 
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील 
शेवगाव - मोनिका राजले 
राहुरी शिवाजीराव कर्डिले 
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
कर्जत जामखेड - राम शिंदे 
केज - नमिता मुंदडा 
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
औसा - अभिमन्यू पवार 
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख 
मान -जयकुमार गोरे 
कराड दक्षिण - अतुल भोसले 
सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
कणकवली - नितेश राणे 
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
इचलकरंजी - राहुल आवाडे 
मिरज - सुरेश खाडे 
सांगली - सुधीर गाडगीळ 

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास याबद्दल आपण पक्षाचे आभारी असून हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, तसेच आपल्यासमोर कोणाचीही आव्हान नसल्याची प्रतिक्रिया अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. 

दक्षिण सोलापुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुभाष देशमुख काय म्हणाले?

सुभाष देशमुख म्हणाले, मोदी, शाह आणि फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशात लोकशाही आहे, तशी भाजपमध्ये देखील लोकशाही आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता इच्छा व्यक्त करतं असतो. तशी इच्छा भाजपकडे अनेकांनी व्यक्त केली होती.  मात्र पक्ष सर्व्हे करत असतो, जो उमेदवार सक्षम असतो त्याला पक्ष संधी देतो.  युतीच्या सरकारने जे कामे केलय, राज्याला दिशा देण्याचे काम या सरकारने केले. राज्याला वैभवशाली करण्यासाठी पुन्हा एकदा याचं सरकारला जनता संधी देईल. दक्षिण सोलापुरात देखील अनेक  कामे केले, रस्ते पाणी असे विकासकामे झाली.

अकोला जिल्ह्यात भाजपच्या चारपैकी एका आमदाराला पहिल्या यादीत पुन्हा संधी....

अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यात आजच्या पहिल्या यादीत अकोला पूर्वचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना राळेगावचे यांना पुन्हा संधी देत उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अकोला पश्चिम, अकोट आणि मुर्तीजापूर या तीन मतदार संघातील उमेदवार अजून ठरले नाही. त्यामूळे अकोटमधून प्रकाश भारसाकळे, मुर्तिजापूरमधून हरीश पिंपळे हे विद्यमान आमदार वेटींगवर आहेत. तर दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या अकोला पश्चिममध्ये भाजप कोण नवा उमेदवार देणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

BJP First candidate list For Maharashtra Vidhansabha : मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा
Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Eknath Khadse: माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद, गिरीश महाजन तुम्ही कोणती शाई लावली? एकनाथ खडसेंचा खोचक सवाल
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
Sachin Pilgaonkar On Dharmendra: 'धरमजींना दिग्दर्शित करणं, माझ्यासाठी खूपच खास होतं...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितला धर्मेंद्रंचा 'तो' किस्सा
'धरमजींना दिग्दर्शित करणं, माझ्यासाठी खूपच खास होतं...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितला धर्मेंद्रंचा 'तो' किस्सा
Waman Mhatre Badlapur Nagarparishad: बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस, नगरपरिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी
Nagpur News : भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
भाजपचा प्रचार करतो म्हणून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचे अपहरण करून मारहाण; नागपूरच्या कळमेश्वरनगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट
Embed widget