एक्स्प्लोर

Sharad Pawar: 'अजितदादांच्या कामाबाबत मनात शंका नाही पण...', शरद पवारांनी सांगितलं नवीन पर्व अन् युगेंद्र पवारांच्या हातात का हवी सत्ता

Sharad Pawar: 'अजितदादांची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाहीत, शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या प्रचारावेळी बारामतीकरांना काय केलं आवाहन?

बारामती: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, ते आज बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात भेटी देत आहेत, आज शरद पवार बारामती शिर्सुफळ दौऱ्यावर आहेत. ते आज अनेक गावांमध्ये भेटी देणार आहेत. आज शिर्सुफळमध्ये शरद पवारांनी सभा घेतली, यावेळी बोलताना  मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. सर्व सत्ता अजित दादांच्या हातात दिली. आता निर्णय तुम्ही घ्यायचे निवडणूका तुम्ही घ्यायच्या. त्यांनी 25- 30 वर्षे त्यांनी ते काम केलं. याबाबत माझ्या मनात शंका नाही. पुढची तयारी करायची की नाही? पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व हवं आहे. ते तयार करावं लागेल. संधी सर्वांना द्यायची असते, असं म्हणत युगेंद्र पवारांना जनतेने निवडून द्यावं असं आवाहन केलं आहे. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, जिरायत भागाने मला द्यायला कधी कमी केलं नाही. सुप्रियाचा देशात संसदेत आज नंबर दुसरा आहे. तुम्हा लोकांचं नाव देशात गेलं आहे. तुम्हा लोकांचा नांव लौकिक महाराष्ट्राच्या बाहेर गेला. समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास पाहिजे, कारखानदारीचा अभ्यास पाहिजे. आज एक एमआयडीसी काढली. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला. याच कामाला गती द्यायची असेल तर जाणकार आणि कष्ट करणारा प्रतिनिधी निवडला पाहिजे म्हणून युगेंद्रची निवड केली.आता काम तुमचं आहे. माझी निवडणूक असो अजित दादांची निवडणूक असो सुप्रियाची निवडणूक असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाही, मत द्यायला कमी केलं नाही. माझं आग्रहाचं सांगण आहे. तुमच्या गावाचा आजपर्यंतचा जो लौकीक होता. तोच तुम्ही पुढे युगेंद्रच्या बाबतीत कराल. घराघरात चिन्ह पोहचवा मतदान कसं होईल ते पाहा, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही – शरद पवार

आज अनेक दिवसातून मी आपल्या गावी आलो. 1965 साली मी बारामती तालुक्यात समाजकारणाला सुरूवात केली. अनेक गावात माझं जाणं येणं होतं. पाण्याची कमतरता होती. गव्हावर तलाव बाधायला काढला. दिवसाची मजूरी म्हणून 2-3 किलो गहु दिला जायचा. लहान-मोठे बंधारे बांधले आणि थोडी फार पाण्याची सोय झाली. नंतर पुढे जानाई शिरसाईचा जन्म झाला. सर्वांना पाणी येत असेल, मी म्हणत नाही पण थोड फार तरी येत असेल आणि चित्र बदललं. शेतीला जोडधंदा म्हणून संकरीत गाई ही संकल्पना या भागात राबवली. एक लाख लिटर दूध उत्पादन वाढले. दूधावर प्रक्रिया करणारे उद्योग आणले. शेती संकटात असेल तर काहीतरी जोडधंदा असायला हवा. एक काळ असा होता बारामतीच्या बाजारपठेत जो माल यायचा तो गाडीत भरणारी लोक चौधरवाडी, तांदुळवाडीचे होते. आज चित्र बदललं आहे,सर्वांची घरं स्लँबची झाली आहेत. राजकारणाचा उपयोग लोकांच्या जिवनात बदल झाला तर त्याला अर्थ आहे. आज बारामतीचा चेहरा बदलला. शिक्षणाची दालणे उघडली. विद्या प्रतिष्ठाणमध्ये 31 हजार मुले मुली शिकतात. मुलं शिकली पाहिजेत त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही जावं, या पध्दतीचं राजकारण या भागात झालं त्याला कारण तुम्ही आहात असंही पुढे शरद पवार म्हणालेत.

शेती संकटात असेल तर दुसरा जोड धंदा पाहिजे. राजकारण फक्त सत्ता आणि निवडणुकीसाठी नाही, राजकारणाचा वापर लोकांच्या जीवनात झाला तर त्याचा उपयोग आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास
मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; बारामतीच्या मैदानातून सुनेत्रा पवारांचा विश्वास
Supriya Sule: 'काल मला सुनेत्रा वाहिनींचा फोन आला...', बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला जाणार की नाही, सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
'काल मला सुनेत्रा वाहिनींचा फोन आला...', बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला जाणार की नाही, सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
Beed Massajog Election : '...तर गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार'; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात निवडणुकीत शड्डू ठोकलेल्या स्वरूपानंद देशमुखांचं मोठं वक्तव्य
'...तर गावासमोर नाक घासून पाठिंबा द्यायला तयार'; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या विरोधात निवडणुकीत शड्डू ठोकलेल्या स्वरूपानंद देशमुखांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर, एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
Embed widget