Beed Crime News :भावानं आत्महत्या केलेल्या झाडाखालीच बबलूला दगडानं संपवलं, धारूरच्या हत्या प्रकरणात आरोपींना कोर्टात हजर करणार
धारूरच्या घटनेने सध्या बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या नावाचे साधर्म्य असल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

Beed Crime News Update: धारूर तालुक्यातील कानापूर येथे जुन्या वादातून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची निर्घृण हत्या करण्यात आली. 2023 साली अविनाश देशमुख या युवकाने स्वप्निल देशमुखच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती,आणि याचाच गुन्हा शिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. स्वप्नील देशमुख उर्फ बबलू देशमुखच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेली तीनही आरोपींना शिरूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संतोष देशमुख, सोनाली देशमुख, रामभाऊ देशमुख या तिन्ही आरोपींना घेऊन शिरसाळा पोलीस धारूरकडे रवाना झाले आहेत.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर आता शिरसाळ्यात हत्या करणाऱ्या व्यक्तीशी संतोष देशमुख यांचे नामसार्धम्य आढळून आल्याने याप्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नक्की काय झालं होतं?
स्वप्नील उर्फ बबलू देशमुखचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख (Avinash Deshmukh) यांनी मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बबलू देशमुख (Bablu Deshmukh) याच्यावर कलम 306, कलम 504, कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठीच बबलू देशमुख हा अविनाश देशमुख यांचा भाऊ संतोष देशमुख (Santosh Deshmkh) यांच्यावर वारंवार दबाव आणत होता. या त्रासाला कंटाळून संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख यांनी बबलू देशमुख याच्यावर हल्ला करुन त्याला संपवले.
हेही वाचा:























