एक्स्प्लोर

महाराष्ट्रात भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, बटेंगे तो कटेंगेच्या मुद्यावरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल 

बटेंगे तो कटेंगे (Batenge Toh Katenge) ही 18 ते 19 व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21 व्या शतकात आहोत. लोक आता फार पुढे गेले आहेत, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली.

Jayant Patil on BJP : बटेंगे तो कटेंगे (Batenge Toh Katenge) ही 18 ते 19 व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21 व्या शतकात आहोत. लोक आता फार पुढे गेले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली. बटेंगे तो कटेंगेच्या मुद्यावरुन जयंत पाटलांनी टीका केली. बटेंगे तो कटेंगे आता येणं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील बेरोजगारीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार 

महाराष्ट्रातील बेरोजगारीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जीएसटी मुळे जनता हैराण झाली आहे. देशात काहीच मोकळे ठेवले नाही. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे असे जयंत पाटील म्हणाले. ते आष्टी - पाटोदा -शिरूर कासार विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील बीड जिल्ह्यात आले होते. यावेली त्यांनी महायुतीवर टीका केली. आमचा उमेदवार गरीब आहे, शून्यातून पुढे आला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत

आष्टी मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मेहबूब शेख यांना देण्यात आली आहे. तर, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शड्डू ठोकला आहे. तर भाजपमधूनच बाहेर पडलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात कोण विजयी होणार, याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात आहे. त्यातच, मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार, आष्टीकर कोणाला पाडणार हेही लवकरच स्पष्ट होईल. 

2019 मध्ये भीमराव धोंडेंचा पराभव

आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 825 मतांनी विजय मिळवला होता. आष्टीमधून त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडा यांचा पराभव केला होता. सध्या भीमराव धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भाजप महायुतीकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
Dhule News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP On Dhananjay Mudne Resign : धनंजय मुंडेचा राजीनामा नैतिकतेला धरुन, राष्ट्रवादीची भूमिका जाहीरABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 04 March 2025Devendra Fadnavis on Munde : धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाSambhaji Bhide on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा राजीनामा, संभाजी भिडे म्हणतात....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
हा तर कायद्याचा गैरवापर, अनेक जणांवर बलात्काराची केस दाखल केलेल्या महिलेला न्यायालयाने खडसावलं
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
... म्हणून CM देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
आजारपणाचं कारण दिलं, पण देशमुखांना साधी श्रद्धांजलीही वाहिली नाही, राजीनामा देताना धनंजय मुंडेंनी लहानपणा दाखवला; कराडला 'महाक्रूर दादा' म्हणत बच्चू कडूंचा प्रहार
Dhule News : खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन हडपली; मंत्री जयकुमार रावल यांना दणका, न्यायालयाचा मोठा निर्णय!
धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं
धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या;अबू आझमींच्या वक्तव्यावरून नवनीत राणा कडाडल्या
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
Stock Market : टाटांच्या एका कंपनीचा स्टॉक 18 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, झुनझुनवाला कुटुंबाला 2500 कोटींचा फटका
टाटांच्या एका कंपनीचा स्टॉक 18 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, झुनझुनवाला कुटुंबाला 2500 कोटींचा फटका
Embed widget